नाशिक : काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला ८८ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त भारिप बहुजन महासंघातर्फे कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुतळा नेहरू गार्डन येथे सत्याग्रहींना अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या अभिवादन सभेला मेघानंद गवळे आदिवासी हक्क परिषदेचे प्रमुख उपस्थित होते. अभिवादन सभेत मेघानंद गवळे, वामनराव गायकवाड, अरविंद जगताप, संजय जाधव, नीलेश सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. या अभिवादन सभेत ताराचंद मोतमल व रमाबाई कन्या वसतिगृहातील विद्यार्थिनींनी क्रांती गीत सादर केले. या सभेचे सूत्रसंचालन सम्राट पगारे यांनी केले. आभार प्रदर्शन अजय काळे यांनी केले. या सभेला अॅड. विनय कटारे, ताराचंद मोतमल, नीलेश सोनवणे, ताराचंद जाधव, अरुण शेजवळ, मारुती घोडेराव, अजय काळे, संजय तायडे, संजय जाधव आदी उपस्थित होते.
काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहींना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:12 IST
नाशिक : काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला ८८ वर्षे पूर्ण झाली.
काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहींना अभिवादन
ठळक मुद्देपुतळा नेहरू गार्डन येथे सत्याग्रहींना अभिवादनहक्क परिषदेचे प्रमुख उपस्थित