शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काजल बोरस्ते प्रथम : पिंपळगावच्या काकासाहेब वाघ महाविद्यालयास फिरता चषकमविप्र क रंडक स्पर्धेचे पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 01:09 IST

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केटीएचएम अभ्यास केंद्राची विद्यार्थिनी काजल बोरस्ते ‘शिक्षण व्यवस्थेची पुनर्रचना : एक विचार’ या विषयावर विचार मांडून मविप्र अखिल भारतीय करंडक स्पर्धेत प्रथम क्रमांकाची विजेती ठरली.

ठळक मुद्देएचपीटी महाविद्यालयाचा अमोल गुट्टे द्वितीय करंडक स्पर्धेचे पारितोषिक वितरण

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केटीएचएम अभ्यास केंद्राची विद्यार्थिनी काजल बोरस्ते ‘शिक्षण व्यवस्थेची पुनर्रचना : एक विचार’ या विषयावर विचार मांडून मविप्र अखिल भारतीय करंडक स्पर्धेत प्रथम क्रमांकाची विजेती ठरली. तिला २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तर काकासाहेब वाघ महाविद्यालय पिंपळगाव बसवंतच्या शुभांगी ढोमसे व सोनाली जगदाळे यांनी त्यांच्या महाविद्यालयाला मविप्र करंडक मिळवून दिला. एचपीटी महाविद्यालयाचा अमोल गुट्टे याने द्वितीय क्र मांक मिळविला. रावसाहेब थोरात सभागृहात शनिवारी (दि.३) मविप्र करंडक स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरचिटणीस नीलिमा पवार यांच्यासह प्रमुख पाहुणे महात्मा गांधी विद्यापीठ मॉरिशसचे मराठी विभागप्रमुख डॉ. बिदन आबा, उपसभापती राघो अहिरे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक भाऊसाहेब खातळे, डॉ. प्रशांत देवरे, सचिन पिंगळे, पद्माकर पाटील, धनंजय धनवटे, रंजना पाटील, कैलास सोनवणे, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, डॉ. पुरु षोत्तम काळे, प्रा. अजित जाचक, प्रा. मुल्तजीब खान, डॉ. डी. डी. काजळे, सी. डी. शिंदे हे व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. बिदन आबा यांनी मॉरिशसमध्येही मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात असून प्राथमिक शिक्षणापासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत मराठी भाषाही शिकविण्यात येत असून, तेथेही वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. नीलिमा पवार यांनी अध्यक्षीय मनोगतात, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग वाढवून नेतृत्वगुणांचा विकास करावा, असे आवाहन केले. प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी विजेत्यांची घोषणा केली. सूत्रसंचालन प्रा. तुषार पाटील व विद्यापीठ प्रतिनिधी ओंकार रोकडे यांनी केले.