शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमार्गाला जमीन देण्यास ‘कही खुशी, कही गम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:18 IST

नाशिक - पुणे सेमी हायस्पिड रेल्वेच्या सुधारित आराखड्याला मध्य रेल्वेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सर्व्हे झालेल्या नायगाव खोºयातील शेतजमिनी अधिग्रहण होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. रेल्वेमार्गाला जमीन देण्यास शेतकºयांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ अशी अवस्था बघायला मिळत आहे.

ठळक मुद्देनाशिक : पुणे सेमी हायस्पिड रेल्वे; शेतजमिनी अधिग्रहित होण्याची शेतकऱ्यांना भीती

नायगाव : नाशिक - पुणे सेमी हायस्पिड रेल्वेच्या सुधारित आराखड्याला मध्य रेल्वेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सर्व्हे झालेल्या नायगाव खोºयातील शेतजमिनी अधिग्रहण होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. रेल्वेमार्गाला जमीन देण्यास शेतकºयांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ अशी अवस्था बघायला मिळत आहे.अनेक वर्षांपासून रखडलेल्या बहुचर्चित नाशिक-पुणे रेल्वेमार्गाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून व राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळताच या मार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे. असे असले तरी मध्य रेल्वेच्या मंजुरीमुळे हा मार्ग होणार हे नक्की मानले जात आहे. त्यामुळे खोºयातील मोह, वडझिरे, ब्राह्मणवाडे, जायगाव, देशवंडी आदी गावांतील ज्या शेतकºयांच्या शेतातून मोजणी झाली आहे, अशा शेतकºयांमध्ये जमिनी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गेल्या अनेक वर्षांपासून अस्मानी व सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडलेले शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. त्यामुळे बेभरवशाच्या शेती व्यवसायाला कंटाळलेले शेतकरी या मार्गासाठी जमीन देण्यास तयार असल्याचे बोलले जात आहे, तर अनेक शेतकरी या मार्गातून आपली जमीन वाचविण्यासाठी मार्ग शोधत आहेत.गेल्या २०-२२ वर्षांपासून नाशिक-पुणे रेल्वेमार्गाची वारंवार चर्चा होत होती. या मार्गासाठी नायगाव खोºयातून अनेकदा विविध ठिकाणाहून जमिनीची मोजणी करण्यात आली आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात या मार्गाची अर्थसंकल्पात तरतूद केल्याने हा मार्ग लवकरच पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र सध्या या मार्गाचे काम थोड्याच दिवसात सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे. नाशिक, मोहदरी, सिन्नर, दोडी, चास, देवठाण, संगमनेर, अंबुरे, साकूर, जांबूत, बोटा, आळेफाटा, नारायण गाव, मंचर, भोरवडी, राजगुरुनगर, चाकण, आळंदी, वाघोली, कोलवडी, मांजरी, हडपसर, पुणे असे या मार्गातील प्रस्तावित थांबे आहे. तसेच नाशिक व पुण्यामधील औद्योगिक क्षेत्रातही थांबे असणार आहे. नायगाव खोºयातील जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, मोह आदी गावांतून आजपर्यंत अनेकवेळा रेल्वेमार्गाची मोजणी करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नसल्यामुळे सध्याच्या मंजुरीनंतरही हे काम सुरू होणार का, असा प्रश्न सध्या शेतकºयांना पडला आहे. अशातच परिसरातील विविध भागातून ही मोजणी झाली असल्यामुळे नेमक्या कोणत्या ठिकाणाहून हा मार्ग जाणार आहे, त्याबाबत शेतकºयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकFarmerशेतकरी