शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कादवाने इथेनॉल प्रकल्प राबवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 22:57 IST

दिंडोरी : केंद्र सरकारने इथेनॉलबाबत योजना जाहीर करत कारखान्यांना त्याचा लाभ घेण्यास सांगितले आहे. त्याबाबत कादवाने सदर विस्तारीकरण व इथेनॉल प्रकल्प राबवणे काळाची गरज असून, कादवाने इथेनॉल प्रकल्प राबवावा, ऊस उत्पादक सभासद संचालक मंडळाच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास ननाशी येथील ऊस उत्पादक सभासद शेखर देशमुख यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देसभासदांची मागणी : ऊस लागवड वाढीसाठी गावोगावी बैठका

दिंडोरी : केंद्र सरकारने इथेनॉलबाबत योजना जाहीर करत कारखान्यांना त्याचा लाभ घेण्यास सांगितले आहे. त्याबाबत कादवाने सदर विस्तारीकरण व इथेनॉल प्रकल्प राबवणे काळाची गरज असून, कादवाने इथेनॉल प्रकल्प राबवावा, ऊस उत्पादक सभासद संचालक मंडळाच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास ननाशी येथील ऊस उत्पादक सभासद शेखर देशमुख यांनी व्यक्त केला.कादवा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने ऊस लागवड व एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी कार्यक्षेत्रातील देहरे, गांडोळे, ननाशी, पिंपळपाडा, वनारे, देवठाण, टिटवे आदी गावांमध्ये बैठका घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ननाशी येथे झालेल्या बैठकीत शेखर देशमुख बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे होते.संचालक मंडळाचे गेल्या अकरा वर्षांचे कामकाज पाहता सर्वांचा त्यांच्यावर विश्वास आहे. साखर उद्योग व त्यापुढील अडचणी आपण दररोज प्रसारमाध्यमांमध्ये बघत आहोत. केंद्र सरकारने या उद्योगाला सावरण्यासाठी इथेनॉलचे भाव वाढवून देत इथेनॉलनिर्मितीवर भर देण्याचे कारखान्यांना सांगितले आहे. त्यासाठी पॅकेजही जाहीर केले आहे, त्याचा लाभ घेणे ही काळाची गरज आहे. या प्रकल्पामुळे उसाला अजून भाव मिळणार असल्याने कार्यक्षेत्रात निश्चित ऊस लागवड वाढणार आहे. भविष्याचा विचार करता कादवाने आपली गाळप क्षमता वाढवावी व इथेनॉल प्रकल्पाची तयारी करावी, असे आवाहन देशमुख यांनी केले.यावेळी बोलताना श्रीराम शेटे यांनी, कादवाने २५०० मे. टन गाळपाच्या दृष्टीने यापूर्वीच विविध मशिनरी दुरुस्ती करताना त्या क्षमतेच्या केल्या आहेत. आता फक्त बॉयलर, टर्बाइन व मिल बसविणे बाकी आहे, असे सांगितले. यावेळी संचालक विश्वनाथ देशमुख, संपतराव कोंड, रघुनाथ दिघे तसेच दिंडोरी गटातून सातत्याने सर्वाधिक ऊस पुरवठा करणारे राजेंद्र देशमुख, भास्कर चौधरी, मुरलीधर कहाणे, सुरेश कदम, सुदाम पवार, सोमनाथ हिंडे, जगन्नाथ नवले, मुरलीधर चौधरी, राजेंद्र ढगे, मच्छिंद्र शिरसाठ उपस्थित होते. ऊस लागवड करण्याची शेतकºयांची ग्वाहीकादवा सहकारी साखर कारखाना उसाला चांगला भाव देत आहे. कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी संचालक मंडळ प्रयत्न करत आहे. चेअरमन श्रीराम शेटे दरवर्षी गावोगावी बैठका घेऊन ऊस लागवड वाढीसाठी आवाहन करत आहेत. त्यामुळे यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून, केंद्र सरकारने साखर उद्योगाबाबत उत्तम धोरण आखल्याने याचा लाभ शेतकºयांना होणार आहे. कादवाने विस्तारीकरण व इथेनॉलची तयारी करावी. त्यासाठी आम्ही पश्चिम भागातील शेतकरी जास्तीत जास्त व आधुनिक पद्धतीने ऊस लागवड करू, अशी ग्वाही देवठाण येथील शेतकरी जगन्नाथ नवले यांनी दिली.