मालेगाव : तालुक्यातील दाभाडी येथील राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये तालुकास्तरीय ग्रामीण कबड्डी स्पर्धा झाली. त्यात तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध वयोगटातील ५० संघांनी भाग घेतला. उद्घाटन राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या डॉ. सुनीता अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे - १४ व १७ वर्षाआतील (मुले) - के. बी. एच. विद्यालय (वडेल), मुली - टी. आर. हायस्कूल ( दाभाडी), १९ वर्षाआतील - मुले - गो. य. पाटील, जळगाव निं., मुली - समता विद्यालय (टेहरे), पायका स्पर्धा - मोक्षणी विद्यालय, वडगाव, मुली - गो. य. पाटील, जळगाव निं.यावेळी मालेगाव तालुका ग्रामीण क्रीडाप्रमुख डी. एन. जाधव, क्रीडाशिक्षक निखिल मोरे, उदय कदम, सुनील आहेर, डी. डी. काळे, मनोहर अहिरे आदि उपस्थित होते. या स्पर्धा बघण्यासाठी परिसरातील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)
दाभाडीत कबड्डी स्पर्धा
By admin | Updated: August 30, 2015 21:34 IST