शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कैवल्यस्वरांनी मोहरला पिंपळपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:14 IST

नाशिक : किराणा घराण्याचे गायक पंडित कैवल्यकुमार गुरव यांनी नेहरू चौकातील पिंपळपारावरील पाडवा पहाटची मैफल यादगार केली. कैवल्यस्वरांनी हिरवागार पिंपळपार मोहरला आणि दर्दी नाशिककरही तृप्त झाले.पंडित संगमेश्वर आणि गणपतराव गुरव यांचा सांगीतिक वारसा लाभलेल्या कैवल्य यांनी राग ललतमध्ये जा रे जा रे बलमोरा या बंदिशीने मैफलीस प्रारंभ केला. त्यानंतर राग ...

नाशिक : किराणा घराण्याचे गायक पंडित कैवल्यकुमार गुरव यांनी नेहरू चौकातील पिंपळपारावरील पाडवा पहाटची मैफल यादगार केली. कैवल्यस्वरांनी हिरवागार पिंपळपार मोहरला आणि दर्दी नाशिककरही तृप्त झाले.पंडित संगमेश्वर आणि गणपतराव गुरव यांचा सांगीतिक वारसा लाभलेल्या कैवल्य यांनी राग ललतमध्ये जा रे जा रे बलमोरा या बंदिशीने मैफलीस प्रारंभ केला. त्यानंतर राग भुपेश्वरी पेश करत मैफलित रंग भरले. सूर चराचर छायो या निरंजनी भजनातही रसिक तल्लीन झाले. घेई छंद मकरंद ही रचना रसिकांना भावली. आयो प्रभात सब जन जागे ही बंदिश राग भिटयारमध्ये सादर केली. द्रुत लईतील व झपतालातील बंदिश विशेष दाद देऊन गेली. गुरव यांना साथसंगत नितीन वारे (तबला), सोनवणे (हार्मोनियम), विनोद कुलकर्णी व संस्कार जानोरकर (तानपुरा) यांनी केली. सूत्रसंचालन प्राजक्त व प्रफुल्ल लेले यांनी केले.  याचवेळी अग्निशमन दलातील राष्ट्रपती पारितोषिक विजेते जवान दीपक गायकवाड, देवीदास इंगळे, शिवाजी खुळगे, हेमंत बेळगावकर, बाळासाहेब लहामगे, शिवाजी फुगट, अविनाश सोनवणे आणि अग्निशमन प्रमुख अनिल महाजन तसेच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्कृती नाशिकचे अध्यक्ष व नगरसेवक शाहू खैरे यांनी स्वागत केले. यावेळी माहिती संचालक शिवाजी मानकर, दिल्लीतील ‘लोकमत’चे राजकीय संपादक सुरेश भटेवरा, नगरसेवक गुरमित बग्गा, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर आदी उपस्थित होते. यावेळी दिवंगत कलावंत प्रमोद भडकमकर आणि अरुण रहाणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.