शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : वेळीच व्हा सावध! कोरोना हळहळू टेन्शन वाढवतोय; ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू
2
टॉप सिक्रेट...! शी जिनपिंग यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत वास्तव्याला; ट्रम्प तिचा व्हिसा रद्द करणार? कोण आहे ती...
3
नेत्याच्या नातेवाइकाविरोधात तक्रार; पोलिसांनी पीडितेला बसवून ठेवले, आरोपींना चहा पाजून सोडले
4
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
5
भारताच्या सीमेजवळ चुकूनही जाऊ नका, चिनी दूतावासाची आपल्या नागरिकांना सक्त सूचना, कारण काय?  
6
भारतानं मित्र सौदी अरेबियासाठी नियमांमध्ये दिली मोठी सूट; येणार मोठा पैसा, चीन पाकिस्तानचा जळफळाट होणार
7
४४ बॉलमध्ये ८४...! रोहित शर्मासोबत 'खेळणारा' तो जितेंद्र भाटवडेकर कोण? रणजी खेळलाय की गल्ली क्रिकेट...
8
डोळा सुजला, काळानिळा पडला, एलन मस्कला नेमकं मारलं कुणी? ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत दिली माहिती   
9
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
10
Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!
11
Tarot Card: कासवाच्या गतीने का होईना, रोज थोडी प्रगती करा; जूनच्या पहिल्या आठवड्याचे टॅरो भविष्य!
12
प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास, आलिशान घर आणि रोल्स रॉईसच्या मालक, कोण आहे ही महिला? पतीची संपत्ती ₹१८,३७० कोटी
13
'ऑपरेशन सिंदूरचे पुरावे हवे असतील तर...' ममता कुलकर्णीने राहुल गांधींवर साधला निशाणा
14
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
15
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
16
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
17
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
18
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
19
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
20
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो

भोकणीच्या सरपंचपदी ज्योती वाघ विजयी

By admin | Updated: June 15, 2016 23:22 IST

भोकणीच्या सरपंचपदी ज्योती वाघ विजयी

 सिन्नर : तालुक्यातील भोकणीच्या सरपंचपदी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण वाघ यांच्या पत्नी ज्योती वाघ यांनी चुरशीच्या निवडणुकीत विजय मिळविला. गेल्या सहा महिन्यांपूर्वी भोकणी ग्रामपंचायतीची सरपंच निवड झाली होती. त्यावेळी वाघ यांच्या गटाने सोनाली साबळे यांना सरपंचपदाची संधी दिली होती. गेल्या महिन्यात साबळे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त जागेसाठी मंडल अधिकारी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली. सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी ज्योती वाघ व भारती अण्णासाहेब सानप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. वाघ यांच्या अर्जावर सूचक म्हणून उपसरपंच शरद साबळे यांनी, तर श्रीमती सानप यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून रंगनाथ सानप यांनी स्वाक्षरी केली होती. निर्धारित वेळेत कोणीही माघार न घेतल्याने गुप्त पद्धतीने मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या ज्योती वाघ यांना पाच, तर भारती सानप यांना चार मते मिळाली. त्यामुळे निवडणूक अधिकारी देशमुख यांनी सरपंचपदी ज्योती वाघ यांच्या नावाची घोषणा केली. ज्येती वाघ यांची सरपंचपदी निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच ज्योती वाघ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोनाली साबळे, भिवाजी कुऱ्हाडे, शोभा कुऱ्हाडे, बाजार समितीचे सभापती अरुण वाघ, सखाराम कुऱ्हाडे, साहेबराव साबळे, कांताराम कुऱ्हाडे, राजेंद्र वाघ, शिवाजी कुऱ्हाडे, अण्णा साबळे, अण्णा डावखर, मोतीराम नन्नावरे, निवृत्ती रणशेवरे यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)