शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
2
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
3
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
4
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
5
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
6
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
7
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
8
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
9
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
10
अपघात, रोग आणि चिंता होईल दूर! फक्त करा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ५ 'रामबाण' उपाय
11
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
12
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
13
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
14
शिराळ्यात नाईक विरुद्ध नाईक चुलत भावांमध्ये लढत! केदार नलवडे रिंगणात; तिरंगी सामन्यात कोण मारणार बाजी ?
15
'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज
16
नुसती ढकलाढकली, मेट्रो जोडणीमुळे घाटकोपर स्टेशन ठरले गर्दीचे 'हॉटस्पॉट'!
17
मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत
18
फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात
19
कमाल! नोकरीसोबतच घराचीही जबाबदारी, ६ वेळा नापास; २ मुलींची आई ४० व्या वर्षी झाली IAS
20
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
Daily Top 2Weekly Top 5

देहभान विसरून ज्येष्ठांनी अनुभवले ‘रम्य ते बालपण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 18:00 IST

सिन्नर : आयुष्यभर सांभाळलेली आयुष्याची जबाबदारी पुढच्या पिढीवर सोपवून उर्वरित आयुष्य समवयस्कांसोबत हसत-खेळत जावे यासाठी येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात.

सिन्नर : आयुष्यभर सांभाळलेली आयुष्याची जबाबदारी पुढच्या पिढीवर सोपवून उर्वरित आयुष्य समवयस्कांसोबत हसत-खेळत जावे यासाठी येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. ज्येष्ठ नागरिकांना सतत आनंदी ठेवण्यासाठी भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक मु. शं. गोळेसर यांनी यावर्षी ढग्या डोंगराच्या पायथ्याशी तळ्यातील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात ज्येष्ठ नागरिकांची सहल, वनभोजन आदींसह आनंद मेळा घेण्यात आला होता.नागपंचमीपासून ढग्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या भैरवनाथ मंदिरात हभप त्र्यंबक बाबा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. याचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आनंद मेळावा आयोजित केला जातो. दुपारी १२ वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिक आपल्या परिवारासह शिदोऱ्या घेऊन मंदिराच्या प्रांगणात जमा झाले. त्र्यंबकबाबा भगत यांच्या ‘सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला’ या भजनाने व ज्येष्ठ नागरिकांच्या सामुदायिक हरिपाठाने मंगलमय वातावरणात आनंदमेळ्याचा शुभारंभ झाला. मेळाव्यात लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीतर्फे नागरिकांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी हेमंत वाजे, लायन्स क्लबच्या अध्यक्ष राजश्री कपोते, सुरेश कट्यारे, जितेंद्र जगताप, डॉ. विजय लोहारकर, वसंत कासट, चंद्रकांत जाधव, महावीर परदेशी, भाऊशेठ जाधव, रघुनाथ गुजर, बाळकृष्ण शिंदे, जानकीराम कर्पे, कृष्णाजी रंधे, पुरुषोत्तम बोरसे, निवृत्ती बोडके, श्रीराम क्षत्रिय, शशिकांत देवळालकर, साहेबराव देशमुख, भानुदास माळी, हिरालाल कोकाटे, रघुनाथ सोनार, अर्जुन गोजरे, विठ्ठल केदार, लहानू गुंजाळ, एकनाथ चव्हाण, विलास कर्पे, अशोक मूत्रक, रामनाथ चव्हाण, स्मिता थोरात, सुजाता लोहारकर, शिल्पा गुजराथी, श्यामल माळवे, जयश्री जगताप, तेजस्विनी वाजे, मेधा पाळसे आदींनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :Nashikनाशिक