शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:42 IST

पंढरपूरच्या विठ्ठलाला आळवणाऱ्या स्वरांसह नृत्यातून जणू नाचे पांडुरंग अशी अनुभूती देणाºया भक्तिपूर्ण कार्यक्रमात नाशिककरही दंग झाले. ते ‘नामाचा गजर’ या संगीत संध्येच्या निमित्ताने.

नाशिक : पंढरपूरच्या विठ्ठलाला आळवणाऱ्या स्वरांसह नृत्यातून जणू नाचे पांडुरंग अशी अनुभूती देणाºया भक्तिपूर्ण कार्यक्रमात नाशिककरही दंग झाले. ते ‘नामाचा गजर’ या संगीत संध्येच्या निमित्ताने.क. का. वाघ कला अकादमीच्या वतीने कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या स्मृतिनिमित्त ४९वे पुष्प परशुराम सायखेडकर नाट्यगृहात पार पडले. आषाढी एकादशीनिमित्त आयोजित या कार्यक्र मात अभंग आणि नृत्यातून विठ्ठलाची आळवणी करण्यात आली. या भक्तिरसाला किशोर पाठक यांचे निरूपण लाभले़कार्यक्रमाचा प्रारंभ ‘जय जय रामकृष्ण हरी’ या नामगजराने झाली. त्यानंतर सुमुखी अथनी यांचे भजनावर आधारित नृत्याने पंढरपूरच्या वाळवंटावर आपण असल्याची अनुभूती झाली. शिल्पा देशमुख यांनी भीमसेन जोशी यांचे कन्नड भाषेतील भाग्यदा लक्ष्मी बारम्मा या महालक्ष्मी स्तुतीपर कवनावर आणि राजस सुकुमार या गाण्यावर पदन्यास केला, तर सुमुखी अथनी यांनी सुंदर ते ध्यान, रु णुझुणू रु णुझुणू रे या अभंगावर नृत्य सादर केले. पुण्याच्या गायिका सानिया पाटणकर यांनी आपल्या द्रुत लयीतील रागदारीवर आधारीत रूप पाहता लोचनी हा अभंग सादर करताना पंढरपूरच्या वाळवंटावरील संतांचा मेळा डोळ्यासमोर उभा केला. गायक पं. मकरंद हिंगणे यांनी चोखामेळा यांचा आम्हा न कळे ज्ञान, अवघे गर्जे पंढरपूर, संत भार पंढरीत हे अभंग सादर केले. आनंद अत्रे यांनी जन्मोजन्मी आम्ही ही रचना सादर केली. कार्यक्र माच्या सुरु वातीला बाळासाहेब मगर, सुनील देशपांडे आणि राजेंद्र ओढेकर यांनी दीपप्रज्वलन केले. गायकांना नितीन पवार आणि सुजित काळे यांनी तबल्यावर, तर राजेश्री धुमाळ यांनी संगीतसाथ केली.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक