शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
2
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
3
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
4
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
5
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
6
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
7
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
8
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
9
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
10
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
12
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
13
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
14
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
15
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
16
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
17
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
18
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
19
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?

शिंपी समाजबांधवांतर्फे सद्विचारांचा जागर

By admin | Updated: November 12, 2016 00:53 IST

संत नामदेव जयंती सोहळा : शहरात शोभायात्रेचे आयोजन

 नाशिक : भागवत धर्माची ध्वजपताका देशभर फडकविणाऱ्या संत नामदेव महाराजांच्या विचारांचा जागर त्यांच्याच जयंतीदिनी राज्यभरातील शिंपी समाजबांधवांनी घडवून आणला. श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या अखिल भारतीय मध्यवर्ती संस्थेच्या वतीने शहरातून प्रथमच मोठ्या स्वरूपात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. शोभायात्रेत हजारो शिंपी समाजबांधव सहभागी झाले होते.संत नामदेव महाराजांची जयंती यंदा दिमाखात आणि वेगळ्या स्वरूपात साजरी करण्याचे नियोजन मध्यवर्ती संस्थेने केले. सकाळी ९ वाजता गोदाघाटावरील गोदावरी पटांगणापासून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत लहान मुलांनी विठ्ठल-रखुमाई तसेच संत नामदेवांच्या वेशभूषा साकारत सहभाग नोंदविला शिवाय गुलालवाडी व्यायामशाळेचे ढोलपथक, बॅँडपथक तसेच काकडे महाराजांचे भजनी मंडळ यांनीही सहभागी होत नाशिककरांचे लक्ष वेधले. संत नामदेव महाराजांचा नामघोष करत निघालेली ही शोभायात्रा मालेगाव स्टॅण्ड, होळकर पूल, रविवार कारंजा, महाबळ चौक, मेहेर, सीबीएस, मोडक सिग्नल, गडकरी चौक, मुंबईनाका मार्गे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात जाऊन पोहोचली. शोभायात्रेच्या मार्गावर आमदार सीमा हिरे, उपमहापौर गुरुमित बग्गा, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी महापौर यतिन वाघ यांनी संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन केले. शोभायात्रेत संत नामदेव महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. अतिशय शिस्तबद्धपणे निघालेली ही शोभायात्रा गायकवाड सभागृहात विसर्जित झाली. त्यानंतर गायकवाड सभागृहात ‘जागर सद्विचारांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कौटुंबिक समस्यांवर सीमा सोनवणे, शिक्षणावर डॉ. मनोज शिंपी, संघटन कौशल्यावर राजेश खैरनार तर मध्यवर्ती संस्थेचे व्हिजन या विषयावर लोकमतचे मुख्य उपसंपादक धनंजय वाखारे यांनी विवेचन केले. प्रास्ताविक मध्यवर्ती संस्थेचे उपाध्यक्ष सुनील (बापू) निकुंभ यांनी केले. सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष विजयनाना बिरारी यांनी आभार मानले. महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)