शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

एसटीत वरिष्ठांच्या खुर्चीवर कनिष्ठ कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:23 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक कार्यालयामध्ये अनेक रिक्त जागांवर कनिष्ठ कर्मचारी कामकाज करीत असून, वर्कशॉपपासून ते डेपोपर्यंत अनेक ठिकाणी वरिष्ठांच्या खुर्चीवरून कनिष्ठांचीच मर्जी चालत असल्याच्या तक्रारी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे करण्यात आल्याचे समजते.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक कार्यालयामध्ये अनेक रिक्त जागांवर कनिष्ठ कर्मचारी कामकाज करीत असून, वर्कशॉपपासून ते डेपोपर्यंत अनेक ठिकाणी वरिष्ठांच्या खुर्चीवरून कनिष्ठांचीच मर्जी चालत असल्याच्या तक्रारी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे करण्यात आल्याचे समजते.राज्य परिवहन महामंडळ आर्थिक तोट्यात असल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यांची अपेक्षित पगारवाढ होऊ शकलेली नाही, शिवाय पदोन्नती झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना अद्यापही पदोन्नतीचे वेतन देण्यात आलेले नाही. याच कारणास्तव वरिष्ठांच्या जागाही यामुळेच रिक्त असून, या जागांचा कारभार कनिष्ठ कर्मचारी सांभाळत आहेत. मात्र, अशा प्रकारचा कार्यभार सांभाळताना होणाºया मनमानी कारभाराचा त्रास मात्र इतर कर्मचाऱ्यांना होऊ लागला असून, या प्रकारच्या तक्रारी मुख्य कार्यालयाकडेदेखील करण्यात आलेल्या आहेत. परंतु अजूनही संबंधित कर्मचाºयांना अभय मिळालेले आहे.एस.टी. महामंडळाच्या नाशिक विभागातील कर्मचाºयांच्या कामकाजावरून निर्माण झालेल्या असमतोलाचा फटका येथे काम करणाºया महिला तसेच नवीन कर्मचाºयांना बसत असल्याच्या तक्रारी आहेत. डेपोपासून ते कार्यालयापर्यंत अनेक महत्त्वाच्या रिक्त पदांची जबाबदारी संबंधित खात्यातील कनिष्ठ कर्मचाºयावर सोपविण्यात आल्यामुळे येथील कारभारावर नियंत्रण मिळवत मनमानी करण्याच्या तक्रारी होत आहेत. वरिष्ठांची खुर्ची सांभाळताना कामकाजात होणारा हस्तक्षेप वाढला असतानाही प्रशासकीय कारवाईप्रसंगी कामगार प्रतिनिधित्वाचा धाक दाखविला जातो, अशी तक्रार आहे.विभागातील जवळपास १२५ वाहकांची वाहतूक नियंत्रक म्हणून पदोन्नती झालेली आहे. मात्र, त्यांना पदोन्नतीचे अधिकृत पत्रच देण्यात आले नसल्यामुळे त्यांना जुन्या पगारावरच कामकाज करावे लागत आहे. प्रत्यक्षात त्यांना पदोन्नतीचे काम दिले तर त्यांचे वाढलेले बेसिक आणि दोन वेतनवाढ द्यावी लागते. त्यामुळे कागदोपत्री पदोन्नती जाहीर केली जाते, कामगिरी मात्र तशी दिली जात नाही.चौकशी गुलदस्त्यातयेथील काही कर्मचाºयांच्या कामकाजाविषयीसेंट्रल कार्यालयाकडे तक्रारी गेल्यानंतर तेथून येथील कार्यालयाला चौकशी करण्याचे आणि प्रसंगी निलंबित करण्याचे खुद्द मंत्रिमहोदयांचे आदेश असतानाही येथील अनेक कर्मचाºयांच्या चौकशा गुंडाळण्यात आलेल्या आहेत, याविषयी कर्मचाºयांमध्ये तीव्र नाराजी आहे.

टॅग्स :Nashikनाशिक