शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कोब्राशी झुंज देत ज्युलीने केले बालकांचे रक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 17:28 IST

सटाणा : श्वान माणसांशी किती इनामदार असते, याचा प्रत्यय बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील घटनेने आला. सचिन मोकासरे यांच्या पाळीव ज्युली नामक श्वानाने घराच्या अंगणात कोब्रा जातीच्या नागाशी झुंज देत त्याचा मुडदा पाडला आणि जवळच खेळत असलेल्या मुलांचा जीव वाचविण्यात महत्वाची कामगिरी बजावली. परंतु, नागाने दंश केल्यामुळे ज्युलीचा वेळेत मृत्यू झाला. शहारे आणणाऱ्या या घटनेने मोकासरे कुटुंबियही हबकले. त्यांनी ज्युलीवर विधिवत अंत्यसंस्कार करत दुखवटा पाळला आणि जीवरक्षक ज्युलीला मानवंदना दिली.

मोराणे सांडस : श्वानाच्या पराक्रमाची अशीही गाथा

सटाणा : श्वान माणसांशी किती इनामदार असते, याचा प्रत्यय बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील घटनेने आला. सचिन मोकासरे यांच्या पाळीव ज्युली नामक श्वानाने घराच्या अंगणात कोब्रा जातीच्या नागाशी झुंज देत त्याचा मुडदा पाडला आणि जवळच खेळत असलेल्या मुलांचा जीव वाचविण्यात महत्वाची कामगिरी बजावली. परंतु, नागाने दंश केल्यामुळे ज्युलीचा वेळेत मृत्यू झाला. शहारे आणणाऱ्या या घटनेने मोकासरे कुटुंबियही हबकले. त्यांनी ज्युलीवर विधिवत अंत्यसंस्कार करत दुखवटा पाळला आणि जीवरक्षक ज्युलीला मानवंदना दिली.

सचिन मोकासरे यांना काही वर्षांपूर्वी श्वानाचे एक पिल्लू जखमी अवस्थेत सापडले होते. त्यांनी त्याच्यावर उपचार करून घरी आणले व त्याचे ज्युली नामकरण करत पालनपोषण केले. घरातीलच एक सदस्य बनलेल्या ज्युलीने गेल्या सोमवारी (दि.१९) भीमपराक्रम गाजवला. घरातील लहान मुले बाहेर अंगणात खेळत होती. तिथेच असणाऱ्या झुडपात एक कोब्रा नाग होता. बहुधा ज्युलीला धोक्याची चाहूल लागली असावी तिने क्षणार्धात त्या नागावर झडप घातली. सुमारे अर्धातास ज्युलीची त्या नागाशी झटापट सुरू होती. ज्युलीची ही लढाई पाहून घरातील सदस्यही तिच्या मदतीला धावले परंतु तिने नागाचा पिच्छा सोडला नाही. त्याला यमसदनी धाडल्यानंतरच ती शांत झाली. मात्र, या झटापटीत ज्यूलीला नागाने अनेक ठिकाणी दंश केल्याने काही मिनिटातच तिच्यात विष भिनत तिनेही निरोप घेतला. ज्युलीने घरातील लहान मुलांचे प्राण वाचवत आपले प्राण त्यागले. आपल्या प्राणाची आहुती देऊन श्वान हा माणसाचा खरा मित्र असल्याचे सिद्ध केले.-----------------

तीन दिवसांचा दुखवटाज्युलीचा संपूर्ण घराला लळा लागला होता. ती घरातीलच एक सदस्य बनली होती. नागाशी झटापटीत तिचाही मृत्यू झाल्याने ज्यूलीच्या मृत्यूमुळे मोकासरे कुटुंबिय सुन्न झाले. त्यांनी ज्युलीचा धार्मिक विधी नुसार अंत्यविधी करत घरात ३ दिवसांचा दुखवटा पाळला. ज्युलीचा हा पराक्रम पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला.

टॅग्स :Nashikनाशिक