शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील बंदिस्त जीवनात मिळाला सणाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 01:09 IST

: रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याला दृढ करणारा स्नेहाचा धागा होय. या सणाला प्रत्येक बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते अन् भाऊदेखील बहिणीच्या या रेशमी धाग्याची आठवण ठेवत सदैव तिच्या रक्षणासाठी काळजी घेतो.

नाशिक : रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याला दृढ करणारा स्नेहाचा धागा होय. या सणाला प्रत्येक बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते अन् भाऊदेखील बहिणीच्या या रेशमी धाग्याची आठवण ठेवत सदैव तिच्या रक्षणासाठी काळजी घेतो. परंतु यापलीकडे समाजात उपेक्षित आणि वंचित असलेल्या दोन घटकांचे काय? ‘त्यांना’ कोण राखी बांधणार आणि ‘त्यांच्या’कडून कोण राखी बांधून घेणार? समाजापासून दूर असलेल्या कारागृहातील बंदिजनांना उपेक्षित समजल्या जाणाऱ्या किन्नरांनी राख्या बांधून सामाजिक बांधीलकीचा मंत्र जपत जणू नवा आदर्श घालून दिला.रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात जेलरोड येथील मंगलमुखी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने किन्नर समाजातील लोकांनी बंदिजनांना राख्या बांधून आनंद द्विगुणित केला. ट्रस्टच्या अध्यक्ष पायल गुरुश्रीश्रीआणि त्यांच्या सहकारी शिला जाधव, संजना महाले, डॉली दोंदे, गौरी आदींनी कारागृहातील सुमारे ४० बंदिजनांना राख्या बांधल्या. कारागृहात गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम राबवित असल्याचे पायल गुरू यांनी सांगितले. परंतु यंदा मात्र या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला. ज्या हाताने कळत-नकळत गुन्हा घडला ते हात पुन्हा वाईट कामासाठी उठू नयेत, त्यासाठी आम्ही त्या हातावर राखी बांधली, अशी त्या मागची भावना असल्याचे पायल गुरुश्रीश्री यांनी सांगितले. तसेच जे केवळ घरापासूनच नव्हे तर समाजापासूनदेखील दूर लोटले गेले आहेत, अशा कैदी बांधवांचे आणि आमचे दु:ख सारखेच आहे.  समाज आमचीदेखील उपेक्षा करतो. आमची हेटाळणी करतो. त्यामुळे आम्हाला या उपेक्षेच्या दु:खाची जाणीव आहे. याच भावनेने आम्ही गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला. परंतु अखेर कारागृह प्रशासनाने आम्हाला या उपक्रमासाठी परवानगी  दिली त्याबद्दल आम्ही कारागृह प्रमुख आणि प्रशासनाचे आभार मानतो. त्यामुळे कैद्यांच्या चेहºयावर समाधान दिसते. यामुळे आम्हालादेखील समाधान लाभते असे पायल गुरु म्हणाले.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनRakhiराखी