शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगाच्या विकासाचा प्रवास हा बदलावर अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:53 IST

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना आपल्या कक्षा सोडून मोठे होताना विविध पातळीवर बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्योगाच्या विकासाचा प्रवास हा मानसिकतेतील बदलासोबतच दृष्टिकोनातील बदलावर अवलंबून आहे.

सातपूर : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना आपल्या कक्षा सोडून मोठे होताना विविध पातळीवर बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्योगाच्या विकासाचा प्रवास हा मानसिकतेतील बदलासोबतच दृष्टिकोनातील बदलावर अवलंबून आहे. अन्यथा मोठे अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते, असे प्रतिपादन निर्लेप समूहाचे माजी अध्यक्ष राम भोगले यांनी केले.राष्ट्रीय स्तरावरील लघुउद्योग भारती या संस्थेच्या रजत जयंती वर्षानिमित्त नाशिक शाखेच्या वतीने औद्योगिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील उद्योजकांच्या उपस्थितीत ‘उद्योग विकास, एक दृष्टिकोन’ या विषयावर बोलताना भोगले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, उद्योग व्यवसाय करताना प्रत्येकाने नियम, कायदा पाळायचा असतो. दृष्टिकोन असला तर यशाकडे जाण्याचे मार्ग मोकळे होतात.प्रमुख पाहुणे म्हणून एबीबी कंपनीचे उपाध्यक्ष गणेश कोठावदे यांनीही मार्गदर्शन केले. प्रदीप पेशकार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक भाषणात अध्यक्ष संजय महाजन यांनी लघुउद्योग भारतीच्या प्रवासाचा आढावा सादर केला. लघुउद्योग भारतीच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या माजी अध्यक्ष विवेक गोगटे, राजेंद्र छाजेड, ओमप्रकाश कुलकर्णी, डी. जी. जोशी, सतीश सिरोंजकर, मारुती कुलकर्णी, विराज लोमटे, मिलिंद कुलकर्णी, बाळकृष्ण नांद्रे, रमेश कनानी, तुषार पटवर्धन यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन धनलक्ष्मी पटवर्धन यांनी केले. मिलिंद देशपांडे यांनी आभार मानले. याप्रसंगी अजय लगड, बाळासाहेब गुंजाळ, मिलिंद कुलकर्णी, अतुल देशमुख, सिद्धार्थ पाटील, निशिकांत आहिरे, कैलास आहेर, तुषार चव्हाण आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन धनलक्ष्मी पटवर्धन यांनी केले. मिलिंद देशपांडे यांनी आभार मानले.

टॅग्स :NashikनाशिकMIDCएमआयडीसी