शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

मराठा क्र ांती मूक मोर्चात सहभागी व्हा

By admin | Updated: September 11, 2016 00:36 IST

करण गायकर : कळवण येथील बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती

 कळवण : कोपर्डी येथील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच मराठा समाजाला आरक्षण व अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात येणार असून, मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने मराठा कुंभमेळा नाशकात भरणार आहे; मात्र शिस्तीचे दर्शन या मराठा क्र ांती मूक मोर्चात दिसेल, असा विश्वास छावा क्र ांतिवीर सेनेचे प्रमुख करण गायकर यांनी कळवण येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.नाशिक येथील मोर्चाचे नियोजन करण्यासाठी कळवण येथील छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या नियोजन बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना गायकर यांनी नियोजनबद्ध माहीत देऊन घराघरातून मराठा समाज बांधव सहभागी होणार आहे. सर्वपक्षीय मराठा नेते एकत्र आले असून, नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्यावी, तसेच मराठा समाजातील नागरिकांवर खोटे आरोप करून त्यांच्यावर जबरीने अ‍ॅट्रॉसिटी अन्वये गुन्हे दाखल केले जातात व नंतर त्यांना ब्लॅकमेल केले जाते. इतर समाजाप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे असून, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. कोपर्डीसारखी घटना पुन्हा घडू नये, मराठा समाजावर अन्याय होऊ नये यासाठी मराठा समाजाने एकत्रित येणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.जिल्ह्यातील हा मोर्चा इतिहास घडवणार असून, त्यासाठी सर्व जण सामील होतीलच; पण जास्त संख्येने कळवण तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन गायकर यांनी केले. मोर्चात दगडफेक झाली, लाठीचार्ज झाला अशा अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माइकवरून येणाऱ्या सूचनांकडेच लक्ष देण्याचेही आवाहन छावा क्रांतिवीर सेनेचे करण गायकर यांनी यावेळी केले.यावेळी शिवसेनेचे जितेंद्र वाघ, मनसेचे शशिकांत पाटील, युवक काँग्रेसचे अतुल पगार, रायुकॉँचे प्रवीण रौंदळ, छावा क्र ांतिवीरचे प्रदीप पगार, भाजपाचे निंबा पगार, मनसेचे अजय पगार आदि उपस्थित होते. (वार्ताहर)