शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

जॉगिंग ट्रॅकने कात टाकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 00:09 IST

इंदिरानगर : येथील जॉगिंग ट्रॅकच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने परिसरातील सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. एकप्रकारे नूतनीकरणाने जॉगिंग ट्रॅकने कात टाकली असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या ठिकाणी फारसे कोणी येत नसले तरी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत काही नागरिक फेरफटका मारताना दिसतात.

इंदिरानगर : येथील जॉगिंग ट्रॅकच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने परिसरातील सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. एकप्रकारे नूतनीकरणाने जॉगिंग ट्रॅकने कात टाकली असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या ठिकाणी फारसे कोणी येत नसले तरी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत काही नागरिक फेरफटका मारताना दिसतात.इंदिरानगर परिसरात सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी संपूर्ण शेती होती, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून पाट बांधण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी फायदा होत होता; परंतु जमिनीस चांगला दर मिळाला तशा जमिनी विकल्या. यानंतर पसिरात कॉलनी व सोसायट्या निर्माण झाल्या. पाण्याविना पाट पडून असल्याने त्या ठिकाणी काही नागरिक केरकचरा व बांधकामाचे नको असलेले साहित्य टाकत असल्याने घाण व दुर्गंधी निर्माण झाली होती. महापालिकेने सुमारे पंधरा वर्षांपूर्वी पाटचारी बुजवून त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक बनवला. त्यामुळे इंदिरानगर, विनयनगर, साईनाथनगर, दीपालीनगर, सूचितानगरसह परिसरातील आबालवृद्ध सकाळ व सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी येथे येतात. दरम्यानच्या काळात जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल घेऊन महापालिकेतर्फे जॉगिंग ट्रॅकचे नूतनीकरणाचे काम सुमारे सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते. यामध्ये प्रभागील नगरसेवकांच्या सुमारे एक कोटी निधीमधून जॉगिंग ट्रॅकचे सपाटीकरण करण्यात आले आहे. त्यावर विटांचे तुकडे टाकून आणि मुरूम टाकण्यात आला आहे, त्यानंतर पाणी मारून सपाटीकरण करण्यात येणार आहे . जॉगिंग ट्रॅकच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने परिसरातील सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.आकर्षक प्रवेशद्वारामुळे सौंदर्यात भरसकाळी व सायंकाळी फेरफटका मारताना जॉगिंग ट्रॅकवर बसवलेले सुमारे ३६ स्पीकरमधून सूरमधुर गीते ऐकायला मिळतात. त्यामुळे परिसरात प्रसन्न वातावरणनिर्मिती होत असते. तसेच जॉगिंग ट्रॅकच्या दोन्ही बाजूस आकर्षक असे प्रवेशद्वार करण्यात आल्याने सर्वांचे लक्ष वेधले जात आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक