शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वंजारी समाज जागेसाठी न्यायालयीन लढा उभारणार जितेंद्र आव्हाड : सिन्नरला समाजबांधवांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:13 IST

सिन्नर : विधायक कामाला विरोध नसून वंजारी समाजाचे मैदान शैक्षणिक संस्थेला देण्याचा निर्णय काही विश्वस्तांनी घेतला आहे. तालुक्यातील वंजारी समाजबांधवांना विश्वासात न घेता विश्वस्तांनी परस्पर हा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देसमाजबांधव एकवटले विधायक कामासाठी ११ लाख देणगी

सिन्नर : विधायक कामाला विरोध नसून वंजारी समाजाचे मैदान शैक्षणिक संस्थेला देण्याचा निर्णय काही विश्वस्तांनी घेतला आहे. तालुक्यातील वंजारी समाजबांधवांना विश्वासात न घेता विश्वस्तांनी परस्पर हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात तालुक्यातील वंजारी समाजबांधव एकवटले असून, वंजारी मैदानाच्या जागेसाठी न्यायालयीन लढा उभारणार असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. येथे आयोजित करण्यात आलेल्या वंजारी समाजबांधवांच्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ, सुदाम बोडके, छगन अहेर, अशोक आव्हाड, लक्ष्मण सांगळे, शंकर कर्पे, नीलेश सानप, गोपाळ बर्के, भारत दिघोळे, किरण मुत्रक, राष्टÑवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष रवींद्र काकड आदी उपस्थित होते. आडवा फाटा येथील वंजारी समाजाची जागा मुंबईत असणाºया वंजारी हमाल बांधवांनी खरेदी केली होती. तालुक्यातील वंजारी समाजाच्या मुलांची शैक्षणिक परवड थांबविण्याचा उद्देश जागा खरेदी करण्यामागचा होता. मात्र, साधारणत: शंभर वर्षांत आपल्याला या जागेवर एक वीटही उभारता न येणे हे दुर्भाग्य असल्याची खंत आमदार आव्हाड यांनी व्यक्त केली. समाजाच्या विधायक कामासाठी ११ लाख रुपयांची देणगी देण्याची घोषणा आव्हाड यांनी यावेळी केली. वंजारी समाज मैदानावर नगरपरिषदेचे आरक्षण पडले त्यावेळी विश्वस्त कोठे होते, असा सवाल आव्हाड यांनी केला. मेळाव्याला समाजबांधव येऊ नये यासाठीही काही जणांनी प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. मैदानावरील विजेचे खांब हटविण्यासाठी शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड लागतात. दिलीप वळसे-पाटील ऊर्जामंत्री असताना तब्बल १ कोटी १२ लाख रुपये खर्चून विजेचे खांब काढण्यात आले. तत्कालीन ऊर्जामंत्री तुकाराम दिघोळे यांना साधे मैदानावर विजेचे खांब का काढता आले नाहीत, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. अ‍ॅड. अशोक आव्हाड यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भारत दिघोळे, रमेश आव्हाड, किरण मुत्रक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील समाजबांधव उपस्थित होते.स्थानिक राजकारणात रस नाहीआपल्याला सिन्नरच्या स्थानिक राजकारणात रस नाही. केवळ समाजाच्या अस्मितेसाठी मी सिन्नरला आलो आहे. त्यामुळे मेळाव्यासाठी न येण्याचे शहाणपण इतरांनी शिकवू नये. मी एकट्याच्या जिवावर राजकरण करतो. बाकी काही देणे-घेणे नाही. वंजारी मैदानाचा लढा संपूर्ण ताकदीने लढविणार आहे.