शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
2
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
3
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
4
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
5
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
6
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
7
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
8
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
9
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
10
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
11
नोकरीचं राहुद्या आता अमेरिकेत फिरायला जाणेही कठीण! ट्रम्प म्हणाले 'या' हेतूने येणाऱ्यांना पर्यटन व्हिसा नाही
12
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
13
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
14
Astro Tips: तिन्ही सांजेला 'या' ५ चुका करणे म्हणजे घरी आलेली लक्ष्मी परतावून लावणे!
15
इंडिगो संकटाची मोठी किंमत! DGCAची कठोर कारवाई, निष्काळजीपणा आढळताच ४ अधिकारी निलंबित
16
Vaibhav Suryavanshi : षटकार-चौकारांची 'बरसात'! वादळी शतकासह वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
17
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
18
ब्रह्मोसपेक्षा वेगवान; भारताला मिळणार 300 रशियन R-37M क्षेपणास्त्रे, सुखोई विमानात बसवले जाणार
19
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
20
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
Daily Top 2Weekly Top 5

‘जिजामाता’च्या सायली अहिरेची राष्ट्रीय तर निकिता बच्छावची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:40 IST

सटाणा : येथील मविप्र संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील सायली कारभारी अहिरे या विद्यार्थिनीची मोहाली (पंजाब) येथे होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी तर निकिता केदा बच्छाव हिची बारामती (पुणे) येथे होणाºया राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संस्थेतर्फेशनिवारी (दि. १) उपसभापती राघो अहिरे, तालुका संचालक डॉ. प्रशांत देवरे व शालेय समिती अध्यक्ष उत्तरा सोनवणे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव केला.

ठळक मुद्देयशस्वी विद्यार्थिनींचा गौरव केला.

सटाणा : येथील मविप्र संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील सायली कारभारी अहिरे या विद्यार्थिनीची मोहाली (पंजाब) येथे होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी तर निकिता केदा बच्छाव हिची बारामती (पुणे) येथे होणाºया राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संस्थेतर्फेशनिवारी (दि. १) उपसभापती राघो अहिरे, तालुका संचालक डॉ. प्रशांत देवरे व शालेय समिती अध्यक्ष उत्तरा सोनवणे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव केला.महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना, बॉक्सिंग फेडरेशन आॅफ इंडिया, महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशन आणि राज्य शासनाच्या क्र ीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भद्रावती (चंद्रपूर) येथे बॉक्ंिसगची राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. सायली अहिरेची या स्पर्धेसाठी निवड झाली होती. अंतिम सामन्यात सायलीने मुंबईच्या स्पर्धकाला चारीमुंड्या चीत करून विजय मिळविला. या विजयामुळे मोहाली येथे होणाºया राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.अंतिम सामन्यात निकिताने उत्कृष्ट खेळ करीत विजय मिळविला. त्यामुळे तिची बारामती (पुणे) येथे होणाºया राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थिनींना क्रीडाशिक्षक प्रा. डी. एम. राठोड, एस.एन. सोनवणे, एस. डी. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यालयात आयोजित विशेष कार्यक्र मात आज संस्थेचे उपसभापती राघो अहिरे, तालुका संचालक डॉ. प्रशांत देवरे व शालेय समिती अध्यक्ष उत्तरा सोनवणे यांच्या हस्ते या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. यावेळी प्राचार्य सुलभा मराठे, उपप्राचार्य एस. जी. भामरे, उपमुख्याध्यापक बी.ए. निकम, पर्यवेक्षक एस.जे. देवरे, बी.बी. सावकार, एम.बी. सोनवणे, बी.जे. पवार, डी. बी. सोनवणे, बी.डी. पाटील, आर.एस. देवरे, योगेश चव्हाण आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.धारावी (मुंबई) येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी कल्याणी यशवंते, मंजूषा शेवाळे व प्रिया जाधव या तीन विद्यार्थिनींची निवड झाली होती. स्पर्धेत मंजूषा शेवाळे हिने उत्कृष्ट खेळ करीत तृतीय स्थान मिळविले. तसेच नाशिक येथील विभागीय क्र ीडा संकुलात झालेल्या विभागीय क्र ीडा स्पर्धेसाठी शाळेच्या निकिता बच्छाव व शांती चव्हाण यांची निवड झाली होती.