शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकसह जव्हार, पालघरला भूकंपाचे सौम्य धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 01:23 IST

नाशिक : नाशिकपासून जव्हार, पालघरच्या दिशेने सुमारे ८० ते ९० किलोमीटरच्या परिसरात मंगळवारी (दि. २४) सकाळच्या सुमारास अवघ्या चार तासांत भूकंपाचे चार सौम्य धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिकपासून ८८ किलोमीटर असून, भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची तीव्रता २.४ ते २.९ रिश्टर स्केलच्या दरम्यान नोंदविण्यात आली आहे. भूकंपामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची ...

नाशिक : नाशिकपासून जव्हार, पालघरच्या दिशेने सुमारे ८० ते ९० किलोमीटरच्या परिसरात मंगळवारी (दि. २४) सकाळच्या सुमारास अवघ्या चार तासांत भूकंपाचे चार सौम्य धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिकपासून ८८ किलोमीटर असून, भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची तीव्रता २.४ ते २.९ रिश्टर स्केलच्या दरम्यान नोंदविण्यात आली आहे. भूकंपामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची हानी झालेली नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. नाशिकपासून जव्हार, पालघरच्या दिशेने सुमारे ८८ किलोमीटर  अंतरावर केंद्रबिंदू असलेल्या भूकं पाचा पहिला धक्का सकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी जाणवला. या भूकंपाची तीव्रता २.९ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. तर ६ वाजून २० मिनिटांनी २.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा धक्का जाणवला. तिसरा धक्का ९ वाजता २.७ रिश्टर स्केल आणि चौथा धक्का १० वाजून २० मिनिटांनी २.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा जाणवला. जिल्हा प्रशासनाला याबाबतचा अहवाल प्राप्त झाला. नाशिक जिल्ह्णात जुलैमध्ये महिन्यात दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहे. यापूर्वी १० जुलै रोजी पेठ तालुक्यातील भायगाव शिवारात सकाळी ७.४० ते ७.४५ दरम्यान २.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. गोंदे, हनुमंतपाडा व उस्थळे या भागातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने यंत्रणेची धावपळ उडाली होती. त्यानंतर १४ जुलै रोजी सकाळी ९ वाजून ३२ मिनिटांनी ३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवल्याने प्रशासनाने प्रारंभी पेठ, सुरगाणा, कळवण तालुक्यात याबाबत विचारणा केली. परंतु, संबंधित भागात धक्के जाणवले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तांत्रिक तज्ज्ञांकडून माहिती घेऊन या भूकंपाचा केंद्रबिंदू जव्हार, पालघरच्या दिशेने ८८ किमी अंतरावर असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :Earthपृथ्वीEarthquakeभूकंप