शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

बंगल्यातून दागिन्यांची तिजोरीच पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:14 IST

आयुक्तालयासह सरकारवाडा पोलीस ठाण्यापासून काही मीटर अंतरावर असलेल्या ‘आनंदव्हिला’ बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी दागिने, रोकड असलेली गोदरेज कंपनीची लोखंडी तिजोरी हातोहात पळविली. या घरफोडीत सुमारे ५० लाखांचे दागिने व एक लाखाची रोकड असा एकूण ५१ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेल्याची घटना सोमवारी (दि.२८) रात्री उघडकीस आली.

ठळक मुद्देआनंदव्हिला बंगला : ५१ लाखांचा ऐवज लुटला

नाशिक : आयुक्तालयासह सरकारवाडा पोलीस ठाण्यापासून काही मीटर अंतरावर असलेल्या ‘आनंदव्हिला’ बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी दागिने, रोकड असलेली गोदरेज कंपनीची लोखंडी तिजोरी हातोहात पळविली. या घरफोडीत सुमारे ५० लाखांचे दागिने व एक लाखाची रोकड असा एकूण ५१ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेल्याची घटना सोमवारी (दि.२८) रात्री उघडकीस आली.गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहाशेजारी असलेल्या रोमेश विजय लुथरा (३६) यांचा आनंदव्हिला नावाचा बंगला आहे. या बंगल्यात ते आपल्या कुटुंबीयांसमवेत राहतात. त्यांच्या घरात मोलकरणीसह अन्य नोकरदार वर्गही ये-जा करीत असतो. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास रोमेश हे त्यांच्या पत्नीसह आईला दवाखान्यात घेऊन कॉलेजरोडला गेले. यावेळी त्यांच्या बंगल्यात केवळ मोलकरीण होती. तिने घरगुती काम आटोपून साडेआठ वाजेच्या सुमारास बंगल्याच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून घर सोडताना संपर्क साधून माहितीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पावणेदहा वाजेच्या सुमारास लुथरा हे आपल्या आई, पत्नीसह घरी परतले असता घराचे कुलूप उघडून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. त्यांच्या आईने जेव्हा आपल्या बेडरूममधील कपाट उघडले तेव्हा, कपाटात ठेवलेले लॉकर गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ ही बाब आपल्या मुलाला सांगितली. रोमेश यांनी बेडरूममध्ये जाऊन खात्री केली असता तिजोरी चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रोमेश यांनी त्वरित घटनेची माहिती पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. रोमेश यांच्या फिर्यादीवरून अज्ञात संशयितांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पत्ताच नाहीबंगल्यात किंवा आवारात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचे तपासात उघडकीस आले आहे. यामुळे गुन्ह्याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांपुढे निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे या गुन्ह्याबाबतचा कुठलाही सुगावा मंगळवारी उशिरापर्यंत लागलेला नव्हता. श्वानांनीदेखील बंगल्याच्या आवारापर्यंतच माग दाखविल्याचे समजते. चौकशीसाठी काही नोकरांनाही रात्री पोलिसांनी बोलविले होते.चोरी झालेले दागिने असे...मंगळसूत्र (३ तोळे) ९० हजार, हिरेजडीत मंगळसूत्र ५० हजार, हिऱ्यांच्या चार बांगड्या ८ लाख,४ हिरेजडीत अंगठ्या ५ लाख, हिरेजडीत पेंडेट सेट ३ लाख, १० तोळे सोन्याचे पेंडेंट ३ लाख, सोन्याचा हार, आभूषणे ८ लाख ४० हजार, हिºयांचा सेट व आभूषणे ५ लाख ५० हजार, इम्पोर्टेड तीन मनगटी घड्याळे २ लाख ३० हजार, १ लाखाची रोकड, १५ हजारांचे लॉकर आदी.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरी