नाशिक : येशू जन्मोत्सवाचा जल्लोष शहरातील सर्व चर्चमध्ये मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आला. संत अॅन्द्रीया चर्चमध्ये खिश्चन बांधवांनी प्रार्थना केली व एकमेकांना शुभेच्छा दिल्या. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नातळनिमित्त शहरातील सर्व चर्चमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. चर्चमध्ये येशू जन्मोत्सवाचे देखावे सादर करण्यात आले आहे. हे देखावे पाहण्यासाठी खिश्चन बांधवांनी गर्दी केली होती. शहरात ठिकठिकाणी खिसमस ट्री, कॅप व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची खिश्चन बांधवांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
येशू जन्मोत्सव उत्साहात साजरा
By admin | Updated: December 25, 2014 01:56 IST