शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पिळकोसला बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 18:20 IST

कळवण तालुक्यातील पिळकोस गावाच्या उत्तरेकडील मेंगदर डोंगररांगेच्या पायथ्याशी राहणाºया शेतकऱ्यांचे बिबट्या व मादीपासून सतत पशुधनाचे नुकसान होऊ लागल्याने परिसरात घबराट पसरली आहे.

ठळक मुद्देपशुधनाचा फडशा : शेतकऱ्यांमध्ये घबराटतातडीने पिंजरा बसविण्याची मागणी

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस गावाच्या उत्तरेकडील मेंगदर डोंगररांगेच्या पायथ्याशी राहणाºया शेतकऱ्यांचे बिबट्या व मादीपासून सतत पशुधनाचे नुकसान होऊ लागल्याने परिसरात घबराट पसरली आहे.आताही वसंत गणपत जाधव यांच्या शेळ्या व बोकड बिबट्या व मादीने फस्त केले. बिबट्या सतत याच शेतकºयांच्या पशुधनाचा फडशा पाडत असून, एकाच शेतकºयाचे पशुधन बिबट्याला बळी ठरत असून, हे बिबटे चार वर्षांपासून वनविभागाच्या हाती लागत नसून या बिबट्या व मादीपासून डोंगराच्या पायथ्यालगत शेती करणारे व वास्तव्य करणाºया शेतकºयांचे पशुधन नष्ट होत असून, शेतकरी बिबट्याच्या या धुमाकुळीने हताश झाले असून वनविभागाने बिबट्याला व मादीला जेरबंद करावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांकडून होत आहे. वनरक्षक एस. टी. आहिरे यांनी मृत शेळी व बोकड यांचा पंचनामा केला असून, पशुवैद्यकीय अधिकारी व्ही. एस.आहेर यांनी शवविच्छेदन करून अहवाल पाठविला आहे.ज्या ठिकाणी कळवण वनविभागाची हद्द समाप्त होते आणि ज्या ठिकाणापासून देवळा वनविभागाची हद्द सुरू होते ते ठिकाण म्हणजे मेंगदर डोंगर. मेंगदर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गप्रेमी शेतकºयांनी तब्बल वीस वर्षांपासून कुºहाडबंदी करून वीस वर्षांत जंगल राखण करून दाट जंगल तयार केले आहे, परंतु याच दाट जंगलातआता वन्यप्राण्यांचे अस्तित्व वाढू लागल्याने या मेंगदर जंगलात सर्वाधिक मोर, ससे, पोपट, माकड, कोल्हे, लांडगे व आता बिबटे-मादीचे वास्तव्य वाढले आहे.मोर, ससे, पोपट माकडे यांनी जरी जंगलाच्या सौंदर्यात वाढ झाली असली तरी, ज्या शेतकºयांनी जंगलाचे रक्षण केले आज त्याच शेतकºयांना या घनदाट जंगलाची भीती वाटू लागली असल्याचे शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मेंगदर डोंगराच्या पायथ्याला वास्तव्य करून शेती करणाºया शेतकºयांना व त्यांच्याकडील पशुधनाला आज वीस वर्षांनंतर धोका जाणवू लागला असून, मागील वर्षीही मेंगदर डोंगराच्या जंगलात बिबट्या व मादीने दोन महिने वास्तव्य केले. त्यावेळेस बिबट्याने जंगलात शेळ्या चारण्यास गेलेल्या दोन आदिवासी बांधवांनाही जखमी करून मोठ्या प्रमाणावर पशुधनाचा फडशा पाडला होता.देवळा वनविभागाने मेंगदर परिसर बिबट्याच्या जाचातून त्वरित मोकळा करावा, अशी मागणी उत्तम मोरे, गटलू जाधव,अभिमन्यू वाघ, केवळ वाघ, बुधा जाधव, मार्कंड जाधव, राहुल सूर्यवंशी यांसह निसर्गप्रेमी, ग्रामस्थ, पशुपालक, शेतमजूर यांनी केली आहे.देवळा वनविभागाने बिबट्या व मादीस जेरबंद करण्यासाठीतत्काळ पिंजरा लावला होता परंतु बिबट्या व मादीला पिंजºयात जेरबंद करण्यात देवळा वनविभागाला अपयश आले होते. दोन महिने पिंजरा लावण्यात आला होता. पिंजºयात सावजही ठेवण्यात आले होते व त्यावेळेस वेळोवेळी पिंजºयाच्या जागाही बदलविण्यात आल्या होत्या, तरीही त्यावेळेस बिबट्या व मादीला देवळा वनविभागाला जेरबंद करता आले नाही. त्यावेळेस बिबट्या व मादीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने जो पिंजरा लावला होता तो आजही त्याच मेंगदर डोंगरावर पडून असून, आता तरी बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी पशुपालक व शेतकºयांकडून केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या