शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे येथे विहिरीत पडलेल्या बछड्याला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 01:19 IST

शिंदे गाव येथील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाने सुरक्षित बाहेर काढून जीवदान दिले. पहाटेच्या सुमारास बछडा विहिरीमध्ये पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नाशिकरोड : शिंदे गाव येथील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाने सुरक्षित बाहेर काढून जीवदान दिले. पहाटेच्या सुमारास बछडा विहिरीमध्ये पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.येथील झाडे मळ्यात दिनकर नामदेव झाडे यांच्या शेताच्या विहिरीत बिबट्याचा बछडा पडला होता. शेतात काम करणाऱ्या महिलांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर वनविभागाला पाचारण करण्यात आले. अथक प्रयत्नाने बछड्याला बाहेर काढून नंतर सोडून देण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गाव शिवारातील झाडे मळ्यात महिला शेतीकाम करीत होत्या. दुपारी एक वाजेच्या सुमारास सिंधू झाडे या पाणी काढण्यासाठी विहिरीजवळ गेल्या असत्या त्यांना बिबट्याचा बछडा पाण्यात पडलेला दिसला. त्यांनी ही बाब पती दिनकर झाडे यांना सांगितली. झाडे यांनी कृषी बाजार समितीचे संचालक संजय तुंगार यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी वनविभागाशी संपर्कसाधल्यानंतर काही वेळातच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले व सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर बछड्याला बाहेर काढण्यात यश आले. बाहेर येताच बछड्याने उसाच्या शेतात धूम ठोकली. घटनास्थळी वनपाल रवींद्र सोनार, वनसंरक्षक विजयसिंग पाटील, जी. बी. पंढरे, अनिल साळवे, वनमजूर सोमनाथ निबेंकर यांनी परिश्रम घेतले.सातत्याने दर्शनशिंदे-पळसे परिसरात उसाच्या शेतीत सातत्याने बिबट्या मादी आणि तिच्या बछड्यांचे अनेकांना दर्शन घडले आहे. गेल्या काही महिन्यांपासून याठिकाणी बिबट्यांचे वास्तव्य वाढले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या