सिन्नर : येथील माळेगाव एमआयडीसीत शुक्रवारी (दि. ४) दुपारी दोन वाजेच्या सुमारास बोलेरो जीपमधून एका शेतकऱ्याचे अडीच लाख रूपये लांबविल्याची घटना घडली. तालुक्यातील वडझिरे येथील शेतकरी कचेश्वर विश्वनाथ बोडके यांनी नायगाव येथील युनियन बँकेत भरण्यासाठी शहरातील संगमनेर मर्चंट बँकेतून दोन लाखांची रक्कम काढली होती, तर पन्नास हजार रूपये एका नातेवाईकाकडून उसने घेतले होते. ही सर्व रक्कम आपल्या बोलेरो जीपमधील पुढच्या बाजूस असलेल्याडिकीत ठेवून एमआयडीसीमधील हॉटेल संस्कृती येथे नाश्त्यासाठी थांबले असता, त्यांच्या गाडीतील रक्कम गायब झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी बोडके यांनी एमआयडीसी पोलीसांत तक्र ार दिली.
जीपमधून अडीच लाख रूपये लंबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 16:00 IST