शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

जे.डी.सी. बिटको इंग्लिश मीडियम स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी केला कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:13 IST

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ५० व्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या जे.डी.सी. बिटको इंग्लिश मीडियम स्कूलच्या २९ बॅचच्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याने स्वखर्चातून एकेक वर्गाची जबाबदारी उचलून अवघ्या अडीच महिन्यांत शाळेचे नूतनीकरण करून रूपडेच बदलून टाकले आहे. स्मार्ट, अत्याधुनिक झालेली शाळा बघून सध्या शिकत असलेले विद्यार्थी खुश झाले आहेत.

नाशिकरोड : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ५० व्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या जे.डी.सी. बिटको इंग्लिश मीडियम स्कूलच्या २९ बॅचच्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याने स्वखर्चातून एकेक वर्गाची जबाबदारी उचलून अवघ्या अडीच महिन्यांत शाळेचे नूतनीकरण करून रूपडेच बदलून टाकले आहे. स्मार्ट, अत्याधुनिक झालेली शाळा बघून सध्या शिकत असलेले विद्यार्थी खुश झाले आहेत. शाळेच्या बॅचच्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवरील ग्रुपमुळे अनेक चांगले उपक्रम राबविले जात आहेत.  बिटको इंग्लिश मीडियम स्कूलने ५०व्या वर्षात पदार्पण केले  आहे. १९९५ च्या दहावीची बॅच असलेल्या माजी विद्यार्थ्यांचे आॅक्टोबर २०१७ मध्ये गेटटुगेदर झाले. त्यावेळी ज्या शाळेत शिकून आपण मोठे झालो त्या शाळेला आपण काहीतरी देऊया असा विचार पुढे आल्यानंतर काही माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या वर्गाचा रंग, खिडक्या, बेंचेस, पंखे आदी आपल्याच काळातील असून,  जुनाट झाले आहेत. त्यामुळे आपण एक वर्ग संस्थेकडून घेऊन त्याचे नूतनीकरण करूया यावर सर्वांचे एकमत झाले. कॉम्प्युटर, सायन्स लॅबचे अत्याधुनिक नूतनीकरणशाळेतील संगणक लॅब अत्याधुनिक बनविली आहे. छताला पीओपी करून त्यामध्ये लावलेली डिझाईन तर प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते. तर सायन्स लॅबचेदेखील पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आले आहे. केमिकल वगळता मानवी सांगाडा, मशिनरी आदी सर्व वस्तू, साहित्य नवीन आणले आहे. शाळेच्या पोर्चमध्ये विविध महापुरुष, शास्त्रज्ञांचे विचार असलेल्या फ्रेम लावण्यात आल्या असून वर्गखोलीबाहेर माहिती कागद चिटकवण्याऐवजी एक फ्रेमच लावून दिली आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीला नवीन कनेक्शन लावून वॉटर प्युरिफायर बसविण्यात आले आहे. विशेष म्हणजे नूतनीकरण करताना कोणाचे नाव लिहिण्यात आले नसून कोणत्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी नूतनीकरणासाठी खर्च केला त्या वर्ग खोलीबाहेर ‘क्लासरूम रिनोवेटेड... बॅच’ अशी पाटी लावण्यात आली आहे.विद्यार्थ्यांचा आदर्श पायंडाजेडीसी बिटको इंग्लिश मीडियम स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल असलेले आपले प्रेम, आठवण एका चांगल्या उपक्रमाद्वारे प्रत्यक्षात आणून आदर्श पायंडा निर्माण केला आहे. याची सुरुवात झाल्यानंतर गेल्या अडीच महिन्यांत विविध बॅचचे अनेक माजी विद्यार्थी घरातील काम आहे, या पद्धतीने शाळा सुरू होण्याच्या आतच पूर्ण करायचे आहे असे झपाटल्याप्रमाणे स्वत:ला पूर्ण झोकून काम पूर्ण केले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी