शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान  घरकुलांमध्ये पोटभाडेकरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:28 IST

महापालिकेने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत उभारलेल्या घरकुलांमध्ये अनेक ठिकाणी पोटभाडेकरू असल्याचे निदर्शनास येऊनही प्रशासनाने केवळ नोटिसा बजावण्यापलीकडे काहीही कारवाई केलेली नाही. त्याबाबत विधी समितीच्या सभेत गांभीर्याने चर्चा होत संबंधित लाभार्थींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश सभापती शीतल माळोदे यांनी संबंधित अधिकाºयांना दिले.

नाशिक : महापालिकेने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत उभारलेल्या घरकुलांमध्ये अनेक ठिकाणी पोटभाडेकरू असल्याचे निदर्शनास येऊनही प्रशासनाने केवळ नोटिसा बजावण्यापलीकडे काहीही कारवाई केलेली नाही. त्याबाबत विधी समितीच्या सभेत गांभीर्याने चर्चा होत संबंधित लाभार्थींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश सभापती शीतल माळोदे यांनी संबंधित अधिकाºयांना दिले.  विधी समितीच्या सभेत मनपाच्या मालकीच्या गाळ्यांमध्ये तसेच घरकुलांमध्ये असलेल्या पोटभाडेकरूंबाबतचा विषय चर्चेला आला असता, सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. सभापतींच्याच प्रभाग क्रमांक २ मध्ये पंचवटीतील निलगिरी बागेमधील घरकुलांचा सर्व्हे केला असता त्याठिकाणी २५ पोटभाडेकरू आढळून आले होते. संबंधित लाभार्थींना महापालिकेने ३ डिसेंबर २०१७ रोजी नोटिसा बजावल्या. परंतु, त्यांचा खुलासा मागविण्याचा कालावधी मात्र नोटिसीत न टाकण्याची चतुराई केली. नोटीस बजावून चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी प्रशासनाने त्याबद्दल कारवाई केली नसल्याचे समोर आले. त्यामुळे संतप्त झालेल्या सभापतींनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करत संबंधित लाभार्थींविरुद्ध तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. संतोष गायकवाड यांनीही घरकुलांमध्ये सर्रास पोटभाडेकरू भरले जात असताना प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त केला. घरकुल योजनेप्रमाणेच महापालिकेच्या गाळ्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर पोटभाडेकरू असूनही त्याबाबत कारवाई केली जात नसल्याचे शीतल माळोदे यांच्यासह नीलेश ठाकरे, उपसभापती राकेश दोंदे, प्रा. शरद मोरे यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी विविध कर विभागाचे अधिकारी एस. एस. आहेर यांनी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या आयुक्तपदाच्या काळात महापालिकेच्या गाळ्यांचा सर्व्हे झाला होता, त्याबाबतचा अहवाल अंतिम कारवाईसाठी आयुक्तांकडे प्रलंबित असल्याचे सांगितले. यावेळी सभापतींनी पुन्हा एकदा नव्याने सर्व्हे करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी, नव्याने झालेले डीपीरोड ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने केलेल्या कार्यवाहीची माहिती हिमगौरी आडके-अहेर यांनी विचारली. परंतु, कनिष्ठ अधिकाºयांना त्याबाबतचे समाधानकारक उत्तर देता न आल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला. सभेला नयन गांगुर्डे, पूनम मोगरे या सदस्यही उपस्थित होत्या.अधिकारी आयुक्तांच्या बैठकीलाविधी समितीची नियोजित सभा सकाळी ११.३० वाजता होती. परंतु, त्याचवेळी आयुक्तांनी अंदाजपत्रकासाठी अधिकाºयांची बैठक बोलावल्याने सभेकडे सुमारे दीड तास कुणीही फिरकले नाहीत. अखेर सहायक नगरसचिवाने जे उपलब्ध असतील त्या कनिष्ठ अधिकारी-कर्मचाºयांना बोलावून घेतले. परंतु, त्यांना सदस्यांच्या प्रश्नांना नीटसी उत्तरे देता आलेली नाहीत. त्याबद्दल शिवसेनेचे संतोष गायकवाड यांनी संताप व्यक्त केला.सभापती शीतल माळोदे यांनीही विधी समितीची बैठक असल्याचे आयुक्तांना सांगण्यात आले नाही काय, असा सवाल करत आयुक्तांनाच समितीच्या बैठका कशा होतात यासाठी बोलावले पाहिजे, असा टोमणा मारला. पूनम मोगरे यांनी तर समिती केवळ नावापुरतीच असल्याने बरखास्त करून टाकण्याची सूचना केली

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका