शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

'जटायू' संवर्धनात नाशिक राज्यात अग्रेसर - सुधीर मुनगंटीवार

By अझहर शेख | Updated: January 29, 2024 18:09 IST

नाशिक शहरातील विविध पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमी संस्थांनी एकत्र येत सोमवारी (दि.२९) कुसुमाग्रज स्मारकात आयोजित केलेल्या निसर्ग सेवकांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मुनगंटीवार बोलत होते.

नाशिक : पर्यावरण व जैवविविधतेच्या संवर्धनासाठी नाशिककर नेहमीच जागरूक राहिले आहे. येथील पर्यावरणवादी सामाजिक संस्थांनी पर्यावरण संरक्षणाची चळवळसातत्याने वाढवत बळकट केली आहे. यामुळे जटायू संवर्धनातसुद्धा नाशिक राज्यात अग्रेसर ठरेल यात शंका नाही, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

नाशिक शहरातील विविध पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमी संस्थांनी एकत्र येत सोमवारी (दि.२९) कुसुमाग्रज स्मारकात आयोजित केलेल्या निसर्ग सेवकांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मुनगंटीवार बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर आमदार देवयानी फरांदे, मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन, बेळगाव ढगा गावाचे सरपंच दत्तु ढगे उपस्थित होते. मनुष्य हा स्वार्थी प्राणी असून त्यापैकीच काही लोक आज पर्यावरणाच्या समस्या निर्माण करत आहेत. अशा ‘शेखचिल्लीं’पासून पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन करणे काळाची गरज आहे. यासाठी पर्यावरण व निसर्गप्रेमी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुनगंटीवार यांनी यावेळी केले. प्रास्ताविक मनोज साठे यांनी केले. तुषार पिंगळे, दीपा ब्रम्हेचा यांनी सुत्रसंचालन केले. आभार अंबरीश मोरे यांनी मानले. यांचा झाला सन्मान

१) वैद्य शंकर शिंदे, खोरीपाडा हरसूल२) देवीचंद महाले, त्र्यंबकेश्वर३) जुही पेठे, नाशिक४) इको-एको वन्यजीव संस्था, वैभव भोगले५) प्रतीक्षा कोठुळे, पक्षीप्रेमी६) डॉ.अनिल माळीदत्ता उगावकर.७) पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक अनिल पवार. नाशिक ठरेल 'सिटी ऑफ जटायू'

पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी सन्मानाला उत्तर देताना वनविभागाकडून गिधाड संवर्धनासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, नाशिक पश्चिम वनविभागाकडून हरसूल, पेठ व तळेगाव या तीन ठिकाणी गिधाडांसाठी उपहारगृह चालविले जात आहेत. अंजनेरी येथे शासनाकडून मिळालेल्या ८ कोटी रूपयांच्या निधीतून लवकरच गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र उभारणी केली जाणार आहे. यामुळे नाशिक लेपर्ड सिटी नंतर सिटी ऑफ जटायू ठरेल असा विश्वास गर्ग यांनी व्यक्त केला.

टॅग्स :NashikनाशिकSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार