जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी, दहावा मैल रस्ता येथे काही अनधिकृत भाजीविक्रेते लॉकडाऊनच्या काळात भाजी विक्री करीत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. याबाबत जानोरी ग्रामपंचायत व ओझर नगर परिषद यांनी संयुक्त कारवाई करीत अनधिकृत भाजी विक्रेत्यांना धडक कारवाई करीत उठवून देण्यात आले.जानोरी, दहावा मैल एअरपोर्ट रस्त्यालगत १७ नंबर चारीजवळ ओझर व जानोरी येथील काही भाजीविक्रेते ठाण मांडल्यामुळे येथील नागरिक भाजीपाला खरेदीसाठी या ठिकाणी प्रचंड गर्दी करत असतात. त्यामुळे कोरोनावाढीची शक्यता होती. याबाबत जानोरीचे तलाठी किरण भोये यांनी वेळोवेळी समज देऊनदेखील काही भाजी विक्रेते उठण्यास तयार नव्हते. भोये यांनी याबाबत ओझर नगरपरिषदेकडेही तक्रार केली. अखेर जानोरी ग्रामपंचायत, ओझर नगर परिषद यांनी संयुक्त कारवाई करीत अनधिकृत भाजीवाल्यांना उठवून देण्यात आले. या कारवाईत जानोरी, मोहाडी, ओझर ग्रामपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी यांनी भाग घेतला.
जानोरी रस्त्यावरील अनधिकृत भाजीबाजार उठवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 00:47 IST
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी, दहावा मैल रस्ता येथे काही अनधिकृत भाजीविक्रेते लॉकडाऊनच्या काळात भाजी विक्री करीत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. याबाबत जानोरी ग्रामपंचायत व ओझर नगर परिषद यांनी संयुक्त कारवाई करीत अनधिकृत भाजी विक्रेत्यांना धडक कारवाई करीत उठवून देण्यात आले.
जानोरी रस्त्यावरील अनधिकृत भाजीबाजार उठवला
ठळक मुद्देभाजी विक्रेत्यांना धडक कारवाई