नाशिक : सुमारे दोनशे वर्षाहून अधिक जुने प्राचीन मंदीर असलेल्या काळाराम मंदिरात मंगळवारपासून जन्मोत्सवाला प्रारंभ होणार आहे. यानिमित्त मंदीरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. रोषणाईने संपुर्ण काळाराम मंदिराचा परिसर उजळून निघाला आहे.जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे मंदिर परिसरात आयोजन करण्यात आले आहे.जन्मोत्सव अर्थात वासंतिक नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार असून हा उत्सव रामनवमीपर्यंत सुरू राहणार आहे. रामनवमीला उत्सवाचा समारोप होणार आहे.
जन्मोत्सव : काळाराम मंदिर उजळले रोषणाईने
By admin | Updated: March 27, 2017 20:46 IST