शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जनलक्ष्मीच्या संचित तोट्यात घट; वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 15:40 IST

बँकेचा २०१६-१७ अखेर एकूण संचित तोटा १९ कोटी ४७ लाख ८४ हजार रुपये होता. परंतु अहवाल वर्षात बँकेला आठ कोटी १६ लाख ९५ हजार रुपयांचा नफा झाला असून, हा नफा संचित तोट्यात वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे मार्च २०१८ अखेर संचित तोट्यात घट होऊन तो ११ कोटी ३० लाख ८९ हजार रुपयांपर्यंत आला असून, बँके च्या संचित तोट्यात घट झाल्याची माहिती संचालक मंडळाने सर्वसाधारण बैठकीत दिली. तसेच बँकेकडे ३१ मार्चखेर १४३ कोटी ७९ लाख ९३ हजार रुयपयांच्या ठेवी असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. 

ठळक मुद्देजनलक्ष्मी सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा संचित तोट्यात ११ कोटी ३० लाख ८९ हजार रुपयांपर्यंत घट

नाशिक: जनलक्ष्मी बँकेचा २०१६-१७ अखेर एकूण संचित तोटा १९ कोटी ४७ लाख ८४ हजार रुपये होता. परंतु अहवाल वर्षात बँकेला आठ कोटी १६ लाख ९५ हजार रुपयांचा नफा झाला असून, हा नफा संचित तोट्यात वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे मार्च २०१८ अखेर संचित तोट्यात घट होऊन तो ११ कोटी ३० लाख ८९ हजार रुपयांपर्यंत आला असून, बँके च्या संचित तोट्यात घट झाल्याची माहिती संचालक मंडळाने सर्वसाधारण बैठकीत दिली. तसेच बँकेकडे ३१ मार्चखेर १४३ कोटी ७९ लाख ९३ हजार रुयपयांच्या ठेवी असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. जनलक्ष्मी सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा परशुराम साइखेडकर नाट्यगृहात शनिवारी (दि.८) बँकेचे अध्यक्ष माजी खासदार माधवराव पाटील यांच्या अध्यक्षतेत खेळीमेळीत पार पडली. व्यासपीठावर बँकेचे उपाध्यक्ष उत्तमराव कांबळे यांच्यासह संचालक रामरतन कारवा, स्वप्ना निंबाळकर, उत्तमराव उगले, श्रीकांत रहाळकर, रवींद्र अमृतकर, भालचंद्र पाटील, शरद गांगुर्डे, सतीश सोनवणे आदी उपस्थित होते. बँक कठीण परिस्थितीत असताना सभासद, ठेवीदार व हितचिंतकांनी बँकेवर विश्वास कायम ठेवल्याचे सांगत संचालक मंडळ व व्यवस्थापनाने एकत्र येत कर्जवसुली मोहीम प्रभावीपणे राबवून आपले अस्तित्व टिकवून ठेवल्याचे सांगितले, तर संचालक मंडळासह व्यवस्थापन व कर्मचाºयांच्या परिश्रमामुळे बँकेने विविध अडचणींवर मात करतानाच रिझर्व्ह बँकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधांचे काटेकोर पालन केल्याने बँकेला कर्जवाटपासारख्या मुख्य व्यवसायाकडे वळता आल्याचे उपाध्यक्ष उत्तमराव कांबळे यांनी सांगितले. प्रास्ताविक जयंत जानी यांनी केले. सूत्रसंचालन संदीप नाटकर यांनी केले. संजय चव्हाण यांनी आभार मानले. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रNashikनाशिकbankबँक