शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच लाखांहून अधिक लाभार्थींना ‘जनधन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 00:31 IST

नाशिक : लॉकडाउननंतर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, गोरगरीब, उपेक्षित आदींवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी केंद्र शासनाकडून मोफत तांदूळ वाटप योजनेबरोबरच घरातील गृहिणींच्या बँक खात्यातही प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून दरमहा पाचशे रुपये जमा करण्यात येत आहेत.

नाशिक : लॉकडाउननंतर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, गोरगरीब, उपेक्षित आदींवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी केंद्र शासनाकडून मोफत तांदूळ वाटप योजनेबरोबरच घरातील गृहिणींच्या बँक खात्यातही प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून दरमहा पाचशे रुपये जमा करण्यात येत आहेत. पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत ठेवींअंतर्गत जिल्ह्यातील ५ लाख ६८ हजार महिलांनी त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम काढून घेत आपापल्या कुटुंबांना आधार दिला.गोरगरीब महिला आणि कुटुंबीयांना या मदतीमुळे महिन्याच्या गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी काहीसा आधार मिळाल्याची नागरिकांची भावना आहे. मे महिन्यापासूनच संबंधित खातेधारकांच्या बँक खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात येत आहे. दरमहिन्याला ५०० रुपये याप्रमाणे ही रक्कम जमा होत असून, संबंधित महिलादेखील त्या रकमेचा उपयोग कुटुंबाच्या गरजेच्या वस्तू खरेदीसाठी करीत आहेत. त्यामुळे रेशनवर मिळणाऱ्या धान्याव्यतिरिक्त भाजी, मीठ, तेल यासाठीची खरेदी करून दैनंदिन जगण्यासाठी आवश्यक त्या अन्नाची उपलब्धता करून देणे महिलांनादेखील शक्य होत आहे. जिल्ह्यात अत्यंत सुरळीतपणे हे वितरण सुरू असल्याचे जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी सांगितले.सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ या साथरोगामुळे एकाच वेळी बँक व ग्राहक सेवा केंद्रांवर गर्दी होऊ नये यासाठी वित्त मंत्रालाच्या वित्तीय सेवा विभागामार्फत वेळापत्रक आखण्यात आले होते. त्या वेळापत्रकानुसार संबंधित महिलांनी येऊन या रकमा काढून घेतल्या आहेत. वित्तीय विभागाने आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार या सर्व महिलांनी रक्कम काढून घेतली. त्यानंतर नियमितपणे संबंधित बॅँक, पोस्टआॅफिस, पोस्टमन, एटीएम, ग्राहक सेवा केंद्रांमधून ही रक्कम महिलांना उपलब्ध होत आहे.

टॅग्स :MONEYपैसा