शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जनता दल अस्तित्वहीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 23:08 IST

नाशिक : सलग पस्तीस वर्षांहून अधिक काळ मालेगाव मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम ठेवून, एकेकाळी राज्याच्या विधिमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद व देशातून एकमेव खासदार संसदेत पाठवून गट नेतेपद खेचून आणणाऱ्या जनता दलाचे यंदा पहिल्यांदाच जिल्ह्यातून अस्तित्व नष्ट झाले आहे. बदललेली राजकीय समीकरणे व पक्षाची धुरा सक्षमपणे हाताळणाºया नेतृत्वाअभावी या पक्षावर मालेगाव मतदारसंघात यंदा एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्दे३५ वर्षांचा बालेकिल्ला संपुष्टात । एमआयएमला समर्थन

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सलग पस्तीस वर्षांहून अधिक काळ मालेगाव मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम ठेवून, एकेकाळी राज्याच्या विधिमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद व देशातून एकमेव खासदार संसदेत पाठवून गट नेतेपद खेचून आणणाऱ्या जनता दलाचे यंदा पहिल्यांदाच जिल्ह्यातून अस्तित्व नष्ट झाले आहे. बदललेली राजकीय समीकरणे व पक्षाची धुरा सक्षमपणे हाताळणाºया नेतृत्वाअभावी या पक्षावर मालेगाव मतदारसंघात यंदा एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ आली आहे.राष्टÑीय जनता दलाच्या निर्मितीपूर्वीपासूनच मालेगाव मतदार संघाने पुरोगामी विचारांना साथ दिली. संयुक्त महाराष्टÑाच्या निर्मितीनंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत स्व. निहाल अहमद यांनी पहिल्यांदाच मालेगाव मतदारसंघावर जनता दलाचा झेंडा फडकविला. त्यानंतर सलग सात वेळा त्यांनी हा बालेकिल्ला अधिक भक्कम केला. एवढेच नव्हे तर तत्कालीन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जनता दलातून थेट संसदेत खासदार पाठविण्यातही मालेगावने वेळोवेळी महत्त्वाची भूमिका बजावली. राज्यात नाशिक जिल्ह्यात व त्यातल्या त्यात मालेगाव मतदारसंघात जनता दलाने आपला गड शाबूत ठेवल्यामुळे जॉर्ज फर्नांडिस, एच. डी. देवगौडा, शरद यादव यांसारख्या राष्टÑीयस्तरावरील नेत्यांनी देखील वेळोवेळी पाठराखण केली. स्व. निहाल अहमद यांचा विधिमंडळातील कामकाजाचा अनुभव लक्षात घेता विरोधी पक्षांच्या वतीने त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही जबाबदारी सोपविली होती. १९९८ मध्ये केंद्रातील अल्पमतातील अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एक मताने पराभूत झाल्यानंतर देशपातळीवरील राजकीय घडामोडीत राष्टÑीय जनता दलाची शकले उडाली व त्यातून जनता दल सेक्युलर या नवीन पक्षाची स्थापना झाली. नाशिक जिल्ह्याने जनता दल सेक्युलरच्या बाजूने कौल दिला. याच काळात जनता दलाचे राज्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी स्व. निहाल यांना प्रदेशाध्यक्षाच्या रूपाने मिळाली. २००४ मध्ये मालेगाव मतदार संघाने परिवर्तन घडविले व जनता दलाची मक्तेदारी संपुष्टात आणली. गेल्या विधानसभा निवडणुकीत स्व. निहाल अहमद यांच्यानंतर त्यांच्या पुत्राने मालेगाव मतदारसंघातून उमेदवारी दाखल करून मतदारांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु मतदारांनी त्याला नाकारले मात्र जनता दलाला दुसºया क्रमांकाची मते मिळाली. यंदा मात्र विधानसभा निवडणुकीत स्व. निहाल यांचा वारसा चालविण्यास कोणीही पुढे न आल्याने जनता दलाला एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019