शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वैकुंठ रथाच्या धर्तीवर आता मुस्लीम समाजासाठी जनाजा रथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:50 IST

मृत व्यक्तीला त्याच्या राहत्या घरापासून अमरधामपर्यंत नेण्यासाठी शववाहिकांबरोबरच वैकुंठरथ आहे. तथापि, आता मुस्लीम समाजासाठी महापालिकेकडून खास जनाजा रथदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नाशिक : मृत व्यक्तीला त्याच्या राहत्या घरापासून अमरधामपर्यंत नेण्यासाठी शववाहिकांबरोबरच वैकुंठरथ आहे. तथापि, आता मुस्लीम समाजासाठी महापालिकेकडून खास जनाजा रथदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रशासनाने दोन वाहने खरेदीची तयारी केली असून, त्यासाठी निविदाही मागविल्या आहेत.महापालिकेच्या वतीने शहरात २००१ पासून मोफत अंत्यसंस्कार योजना राबविण्यात येते. मात्र ती नंतर अन्य धर्मीयांसाठीदेखील लागू करण्यात आली. त्यानंतर मृत व्यक्तीच्या घरापासून अथवा रुग्णालयापासून थेट अमरधाममध्ये जाण्यासाठी सुरुवातीला केवळ महापालिकेच्या शववाहिकेचा वापर केला जात असे. नंतर वैकुंठरथाची संकल्पना पुढे आली. अनेक खासगी सेवाभावी संस्था तसेच नगरसेवकांनी त्यात पुढाकार घेतला आणि वैकुंठ रथ उपलब्ध करून देण्यात येऊ लागले. माजी आमदार (कै.) उत्तमराव ढिकले यांनी प्रथमच आमदार निधीतून वैकुंठ रथ घेतला आणि तो महापालिकेला उपलब्ध करून दिला. वैकुंठ रथावर अधिक जागा तसेच भजन-कीर्तन लावण्याची सोय असल्याने वैकुंठ रथाची मागणी वाढली. त्यामुळे नाशिक महापालिकेनेदेखील दोन वैकुंठ रथ खरेदी केले आहेत. परंतु महापालिकेने त्या त्या समाज किंवा धर्मीयांच्या पद्धतीप्रमाणे अंत्यसंस्काराची सुविधा द्यावी, अशी मागणी वाढल्यानंतर महानुभव, लिंगायत, मुस्लीम तसेच अन्य अनेक समाजाला त्यांच्या प्रथेप्रमाणे अंत्यसंस्काराच्या सुविधा दिल्या जातात. परंतु वैकुंठ रथाच्या धर्तीवर मुस्लीम समाजासाठीदेखील जनाजा रथ उपलब्ध करून द्यावा, ही मागणी होत होती.महापालिकेच्या विविध समित्यांमध्ये यासंदर्भात ठराव झाला असला तरी त्याला मुहूर्त लागत नव्हता. मात्र, महापालिकेने तयारी सुरू केली तर लोकसभा निवडणकीसाठी आदर्श आचारसंहिता सुरू झाली. ती संपल्यानंतर आता महापालिकेने दोन जनाजा रथांसाठी निविदा मागविल्या आहेत. २४ लाख रुपये खर्च करून दोन रथांची खरेदी करून ते आरोग्य विभागाकडे सुपूर्द केले जाणार असल्याचे यांत्रिकी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMuslimमुस्लीम