शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आडगावच्या भूमिपुत्राचा जम्मू-काश्मीरमध्ये मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 00:52 IST

आडगाव येथील भूमिपुत्र व सीमा सुरक्षा दलाच्या ३१ बटालियनचे हवालदार आप्पासाहेब मधुकर मते (३६) यांचे जम्मू-काश्मीरमध्ये अतिउंचीवर कर्तव्य बजावताना प्राणवायू अपुरा पडल्याने हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता बुधवारी (दि. ८) धडकताच परिसरात शोककळा पसरली.

आडगाव : येथील भूमिपुत्र व सीमा सुरक्षा दलाच्या ३१ बटालियनचे हवालदार आप्पासाहेब मधुकर मते (३६) यांचे जम्मू-काश्मीरमध्ये अतिउंचीवर कर्तव्य बजावताना प्राणवायू अपुरा पडल्याने हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता बुधवारी (दि. ८) धडकताच परिसरात शोककळा पसरली.जम्मू-काश्मीरमध्ये सध्या हिवाळ्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होत असून, आप्पासाहेब यांचे पार्थिव नैसर्गिक वातावरण निवळताच विमानाने मुंबईत आणले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली. २००५ साली ते सैन्याच्या सीमा सुरक्षा दलात दाखल झाले होते. ते ३१ बटालियनमध्ये हवालदार पदावर सेवा बजावत होते. श्रीनगरमध्ये रक्त गोठविणारी हिमवृष्टी अंगावर झेलत आप्पा हजारो फूट उंचीवरील सीमेवर पहारा देत होते. मंगळवारी (दि.७) प्राणवायू अपुरा पडल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी सकाळी ही वार्ता सैन्यदल व जिल्हा प्रशासनाकडून त्यांचे बंधू भगीरथ यांना समजताच मते कुुटुंबीयांवर दु:खचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दहा वर्षांचा मुलगा प्रतीक, भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.दोन दिवसांपूर्वीच घेतली होती ‘गुड न्यूज’आप्पासाहेब यांनी दोन दिवसांपूर्वीच पत्नी मनीषा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधला. यावेळी घरात लवकरच बाळ येणार असल्याची ‘गुड न्यूज’ त्यांच्या पत्नीने त्यांना दिली. मागील महिन्यात आप्पा पंधरवड्याची सुटी घेऊन घरी आले होते.आप्पांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण आडगावच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी केटीएचएममधून पूर्ण केले. बारावीची परीक्षा कला शाखेतून उत्तीर्ण केल्यानंतर ते सैन्यात दाखल झाले. लहानपणापासून व्यायामाची आवड व चुलत आजोबांकडून मिळालेले कुस्तीच्या डावांचे बाळकडू घेतले होते. कराटेमध्येही आप्पांनी ‘ब्लॅकबेल्ट’ मिळविला होता.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभाग