शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जालन्याचा सराईत कर्णबधिर गुन्हेगार ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:23 IST

शालिमार येथील नेहरू उद्यानाजवळ दोघा संशयितांनी अचानकपणे शनिवारी (दि.१) पोलिसांच्या गस्त पथकाला पाहून पळ काढण्यास सुरुवात के ली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पाठलाग करून जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील कर्णबधिर सराईत गुन्हेगार दगडुबा मुकुंदा बोर्डे याच्या मुसक्या आवळल्या. त्याचा दुसरा साथीदार फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नाशिक : शालिमार येथील नेहरू उद्यानाजवळ दोघा संशयितांनी अचानकपणे शनिवारी (दि.१) पोलिसांच्या गस्त पथकाला पाहून पळ काढण्यास सुरुवात के ली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पाठलाग करून जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील कर्णबधिर सराईत गुन्हेगार दगडुबा मुकुंदा बोर्डे याच्या मुसक्या आवळल्या. त्याचा दुसरा साथीदार फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दोघे संशयित युवक हातात काहीतरी साहित्य घेऊन नेहरू उद्यानाच्या परिसरात एकत्र उभे होते. यादरम्यान भद्रकाली पोलिसांचे गुन्हे शोध पथकाचे गस्त पथक उपनिरीक्षक विशाल मुळे, हवालदार सोमनाथ सातपुते, उत्तम पाटील, संतोष उशीर, साहिल सय्यद यांचे वाहन पाहून संशयित दोघांनी पळ काढला. दरम्यान, पोलिसांनीदेखील त्याचां पाठलाग करण्यास सुरुवात केली.एक संशयित बोर्डे हा पोलिसांच्या हाती लागला, तर त्याचा दुसरा साथीदार पळून जाण्यास यशस्वी ठरला. बोर्डे याची झडती घेतली असता त्याच्याकडून लोखंडी दोन कटावण्या, किल्ल्यांचा जुडगा, एका चादरीमध्ये बांधलेला दहा हजार रुपये किमतीचा एलइडी टीव्ही पोलिसांनी जप्त केला.  बोर्डे व त्याचा फरार झालेला साथीदार परिसरात जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने कट रचण्याकरिता एकत्र आले होते, असे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू  आहे़गुन्हेगाराला पोलीस कोठडीबोर्डे हा भोकरदन येथील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर भोकरदन पोलीस ठाण्यात ४ घरफोडी, १ चोरीचा तर जाफराबाद, पद्मापूर, हसनाबाद या पोलीस ठाण्यात प्रत्येकी १ असे तीन घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती जालना पोलिसांनी दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांनी सांगितले. बोर्डे यास ऐकू येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने हाताच्या इशाऱ्याने पोलिसांना सांगितले. त्यावेळी त्याने स्वत:चा नाव, पत्ता कागदावर पोलिसांना लिहून दिला. भद्रकाली पोलिसांनी बोर्डे याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. त्यास न्यायालयापुढे हजर के ले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिस