शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साथरोग रोखण्यासाठी जलकुंभ शुद्धीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 00:45 IST

देवळा : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे आजार रोखण्यासाठी पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने पाणी गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक जलकुंभ व हातपंप शुद्धीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ग्रामीण जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी ग्रामपंचायत, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रासह शासकीय व सार्वजनिक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाची स्वच्छता करण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे.

देवळा : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे आजार रोखण्यासाठी पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने पाणी गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक जलकुंभ व हातपंप शुद्धीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ग्रामीण जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी ग्रामपंचायत, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रासह शासकीय व सार्वजनिक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाची स्वच्छता करण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सहाय्यक, जल सुरक्षा रक्षक यांच्या मदतीने जलकुंभाची स्वच्छता करण्यात येणार असून, हातपंपाची दुरुस्ती व शुद्धीकरण आदी कामे अभियानात करण्यात येणार आहे.पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या असून, टीसीएल पावडरची उपलब्धता, वाटप नियोजन व कार्यवाहीबाबतची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावर सोपवण्यात आली आहे.---------------------------१ जूनपासून सुरू झालेल्या अभियानांतर्गत देवळा तालुक्यातील १८९ शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शिक्षकांनी विद्यार्थी व ग्रामस्थांच्या मदतीने कोरोनाबाबत खबरदारी घेत पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता केली आहे. सार्वजनिक जलकुंभाच्या दर्शनी भागात पक्क्या रंगांनी जलकुंभ स्वच्छतेची तारीख प्रदर्शित करण्याबाबत सुचवण्यात आले आहे.- सुनीता धनगर,गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती

टॅग्स :Nashikनाशिक