शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कॉपी प्रकरणात जळगावची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 23:27 IST

नाशिक : बारावी परीक्षेच्या पूर्वार्धातच विभागातील जळगाव जिल्ह्याने कॉपी प्रकरणांमध्ये आघाडी घेतली आहे. जळगावमध्ये पहिल्या पेपरपासूनच गंभीर स्वरूपाची कॉपी प्रकरणे समोर आली आहे. सहा दिवसांत जळगावमधून सर्वाधिक ३० कॉपीची प्रकरणे समोर आली आहे. नाशिक जिल्हा कॉपी प्रकरणांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे, तर धुळे जिल्ह्यात मात्र अद्याप एकही कॉपीचे प्रकरण समोर आलेले नसून धुळ्याची कॉपीमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.

ठळक मुद्देनाशिक दुसरे : बारावी परीक्षेत धुळ्याची कॉपीमुक्तीकडे वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बारावी परीक्षेच्या पूर्वार्धातच विभागातील जळगाव जिल्ह्याने कॉपी प्रकरणांमध्ये आघाडी घेतली आहे. जळगावमध्ये पहिल्या पेपरपासूनच गंभीर स्वरूपाची कॉपी प्रकरणे समोर आली आहे. सहा दिवसांत जळगावमधून सर्वाधिक ३० कॉपीची प्रकरणे समोर आली आहे. नाशिक जिल्हा कॉपी प्रकरणांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे, तर धुळे जिल्ह्यात मात्र अद्याप एकही कॉपीचे प्रकरण समोर आलेले नसून धुळ्याची कॉपीमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.यावर्षी जळगावातील भडगाव येथील परीक्षा केंद्रावर पहिल्याच दिवशी उत्तरपत्रिका तयार करून छायांकित प्रती तयार करण्यासारखा गंभीर प्रकार समोर आला. त्यानंतर ३० कॉपीप्रकरणे समोर आली आहेत. विभागात जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणेच सर्वाधिक कॉपीची प्रकरणे समोर येत असल्याने येथील शिक्षण व्यवस्था चर्चेचा विषय बनली आहे. परीक्षेस १८ फेब्रुवारीला प्रारंभ झाला. या पेपरला विभागातून १९ कॉपी प्रकरणे समोर आली, तर २० फेब्रुवारीला १२ कॉपी, २२ फेब्रुवारीला हिंदी भाषेच्या पेपरला ५ कॉपी, भौतिकशास्त्र व चिटणीसांची कार्यपद्धती आणि राज्यशास्त्र विषयांमध्ये १५ कॉपी, रसायनशास्त्र व वाणिज्य संघटन व व्यवस्थापनमध्ये २७ आणि २८ फेब्रुवारीला गणित आणि संख्याशास्त्राच्या पेपरला तीन कॉपीची प्रकरणे समोर आली. यात इतिहासाच्या पेपरला सर्वाधिक २१, तर इंग्रजीला १९ कॉपी प्रकरणे झाल्याचे समोर आले आहे, तर २९ फेब्रुवारीला झालेल्या सहकारशास्त्र को-आॅपरेशन व भूशास्त्राच्या पेपरला कोणताही गैरप्रकार घडला नाही.शिक्षण विभागाने कॉपीमुक्त अभियान सुरू केले असून, त्यासाठी विभाग व जिल्हास्तरावर भरारी पथके निर्माण केली आहे. असे असताना जळगावमध्ये ३०, नाशिकमध्ये २७, नंदुरबारमध्ये २३ कॉपीची प्रकरणे समोर आली आहे. धुळे जिल्ह्यात मात्र अद्याप एकही कॉपीचे प्रकरण समोर आलेले नसल्याने धुळ्याची कॉपीमुक्त परीक्षेच्या दृष्टीने यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे यानिमित्त समोर आले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा