शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जैन संघटनेचे युवती सक्षमीकरणाला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:07 IST

कोणत्याही कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता मुलींमध्ये निर्माण करण्याची ताकद स्मार्ट गर्ल कार्यशाळेत आहे. विभागातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबवावा व सशक्त समाजनिर्मितीकरिता कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा,

नाशिक : कोणत्याही कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता मुलींमध्ये निर्माण करण्याची ताकद स्मार्ट गर्ल कार्यशाळेत आहे. विभागातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबवावा व सशक्त समाजनिर्मितीकरिता कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे राज्य प्रभारी व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर साखला यांनी केले. भारतीय जैन संघटनेची (बीजेएस) कार्यकर्ता संपर्क सभा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियर्सच्या सभागृहात नुकतीच संपन्न झाली. संघटनेचे राज्याध्यक्ष हस्तीमल बंब (जालना), राज्य सचिव रत्नाकर महाजन (हिंगोली), राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक चोपडा, प्रतापमल बाफणा (मालेगाव), राज्य मार्गदर्शक प्रफुल्ल पारख, सुनील चोपडा, पंकज पटणी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.साखला म्हणाले, भारतीय जैन संघटनेमार्फत स्मार्ट गर्ल, महाराष्ट्र दुष्काळमुक्त अभियान अंतर्गत सुजलाम सुफलाम उपक्रम, प्लॅस्टिक सर्जरी शिबिर, इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांकरिता मूल्यवर्धन अभ्यासक्रम, विवाहेच्छुक युवक-युवतींचे परिचय संमेलन, व्यवसाय विकास कार्यशाळा, अल्पसंख्याक समाजाचे अधिकार व जागरूकता, जलसंवर्धन आणि चारा छावण्याबाबत मोठ्या प्रमाणात काम झाले आहे.शांतीलाल मुथा यांच्या विचारातून नवीन भारत निर्माण करण्याच्या संकल्पनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन राज्याध्यक्ष हस्तीमल बंब यांनी केले. यावेळी राज्यभरातील गाव, तालुका व जिल्हास्तरीय पदाधिकारी यांच्या संपर्क निर्देशिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विभागीय अध्यक्ष यतीश डुंगरवाल यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्र मास ललित सुराणा, गोटू चोरडिया, सतीश बोरा आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक