शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

जैन संस्थेने गुणवत्तापूर्ण, संस्कारक्षम पिढी घडविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 06:19 IST

राजेंद्र दर्डा; चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या विविध शाखांच्या इमारतींचे उद्घाटन

चांदवड : येथील श्री. नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संस्थेने ज्ञानदानाबरोबरच गुणवत्ता, चारित्र्य व संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम केले ही कौतुकास्पद बाब असून संस्थापक पूज्य केशवलाल हरकचंद आबड यांनी अवघ्या चार विद्यार्थ्यांपासून सुरू केलेल्या या संस्थेचे आज ९० व्या वर्षी वटवृक्षात रुपांतर झाले आहे. गुरुकुल पद्धतीने शिक्षण देताना उत्कृष्ट वसतीगृह, के. जी. ते पी.जी.पर्यंत शिक्षणांचा वसा घेताना गुणवत्तेत तडजोड न केल्यामुळेच संस्थेने दखलपात्र काम उभे केले आहे. त्याच बळावर या संस्थेच्या जैन विद्यापीठाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास सकल जैन समाजाचे अध्यक्ष आणि लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केला.

संस्थेची नवनिर्मित महाविद्यालय इमारत, विविध शाखेच्या विभागांचे उद्घाटन, प्रवेशद्वाराचे नामकरण तसेच दानशूर समाजबांधवांच्या सन्मान समारंभप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त संपतलाल सुराणा होते. प्रमुख अतिथी म्हणून लासूर स्टेशनचे आमदार प्रशांत बंब, औरंगाबादचे आमदार सुभाष झांबड, नाशिकरोडचे मोहनलाल चोपडा, मालेगावचे विजयकुमार लोढा, मुंबईचे सी. बी. छाजेड, जयपूरचे लाभचंद कोठारी, चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, अविनाश चोरडिया, पारसमल मोदी (जैन), अशोक जैन आदी उपस्थित होते.

हमने सोचा हम ही चाहते है आपको, पर आपको चाहनेवालो का काफीला निकाला, मैने कहा चलकर शिकायत खुदा से, पर वो खुदा भी आपका चाहनेवाला निकला, असे सांगत दर्डा म्हणाले, या २८ एकर निसर्गाच्या सान्निध्यात ९० वर्षांपासून ज्ञानदानाचे काम करणारे शिक्षणप्रेमी संस्थाचालक हे गुणवत्ता तत्त्वावर विद्यार्थ्यांना प्रवेश देतात, हे मोठे काम आहे. प्रांरभी नुतन इमारती व विविध शाखांचे उद्घाटन व नामकरण करण्यात आले. संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष संपतलाल सुराणा यांनी ९२ व्या वर्षात पदार्पण केल्याने त्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रबंध समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट चेअरमन पुरस्कार मिळाल्याबद्दल तर मुंबई येथील पारसमल बुधमल जैन (मोदी) यांची श्री. आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फ्रेस, नवी दिल्लीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाल्याबद्दल गौरव करण्यात आला.दात्यांचा सत्कारजीवन रविंद्र संचेती (वैजापूर), राजेंद्र बोरा (पुणे), रमेशजी फिरोदिया (अहमदनगर), मदनलाल पारसमल, अशोकजी, ललीतजी, गौतमजी साखला (नाशिक), अनिल खिवंसरा (मुंबई), शोभाचंद संचेती (वैजापूर), हुकुमचंद पारख (नांदगाव), अरविंद भन्साळी (कोपरगाव), रविंद्र शिंगी (कोपरगाव) आदी दात्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरNashikनाशिक