शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयात महिलांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:50 IST

जिल्हा शासकीय रुग्णालयातील दोन खोल्यांमध्ये सुरू असलेले लघुवेतन कर्मचारी संघटनेचे अजिज शेख यांचे कार्यालय हटवावे, कार्यालयाचे थकलेले १४ लाख रुपयांचे भाडे वसूल करावे, तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी महिलांच्या न्याय्य मागण्या पूर्ण कराव्या या मागणीसाठी राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या उपाध्यक्ष उज्ज्वला कराड यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि़ २८) जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले़

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील दोन खोल्यांमध्ये सुरू असलेले लघुवेतन कर्मचारी संघटनेचे अजिज शेख यांचे कार्यालय हटवावे, कार्यालयाचे थकलेले १४ लाख रुपयांचे भाडे वसूल करावे, तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी महिलांच्या न्याय्य मागण्या पूर्ण कराव्या या मागणीसाठी राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या उपाध्यक्ष उज्ज्वला कराड यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि़ २८) जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले़  जिल्हा रुग्णालयातील दोन खोल्यांमध्ये अजिज शेख यांचे लघुवेतन कर्मचारी संघटनेच्या नावाने कार्यालय सुरू आहे़; मात्र ही संघटनाच बेकायदेशीर असल्याने या दोन्ही खोल्या काढून घेण्यात याव्यात तसेच या खोल्यांचे भाडे वसूल करावे, महिला कर्मचाºयांना सन्मानाची वागणूक द्यावी यासाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आले़ विशेष म्हणजे यासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा करणाºया कराड यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता़  चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू करताच रुग्णालय प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन सरकारवाडा पोलिसांना लेखी पत्र दिले आहे़ या पत्रात येत्या सोमवारी (दि़ ३१) जिल्हा रुग्णालयातील लघुवेतन कर्मचारी संघटनेचे कार्यालय रिकामे करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे़ जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर महिला आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले़