शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात राष्ट्रवादीतर्फे जेलभरो

By admin | Updated: September 15, 2015 22:51 IST

कळवण, नांदगाव, सटाणा येथे आंदोलन : चारा डेपो, छावणी व कर्जमाफीची शेतकऱ्यांची मागणी

कळवण : दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असून, सरकारने दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी या मागणीसाठी जिल्हाभरात राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले.विरोधी पक्षात असताना गेल्यावर्षी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आत्महत्त्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. सध्या फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. शेतकरी आत्महत्त्या थांबलेल्या नाहीत. आता फडणवीस हे स्वत:वर खुनाचा गुन्हा दाखल करणार का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी केला असून, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, वीजबिल माफ करावे, कळवण तालुका दुष्काळी जाहीर करावा, कळवणच्या धरणातील पाणी प्रथम कळवणसाठी आरक्षित करावे आदि मागण्या करून शासनाचे लक्ष वेधले आणि मागण्या मंजूर झाल्या नाहीतर उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जयश्री पवार यांनी कळवण बसस्थानकाजवळ जेल भरो आंदोलनाप्रसंगी दिला.कळवण तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करावा, वीजबिल माफी करून वीजपुरवठा सुरळीत करावा, कळवण आदिवासी तालुका दुष्काळी जाहीर करावा, शासकीय वसतिगृहात आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, कळवण तालुक्यातील धरणातील पाणी कळवण तालुक्यासाठी प्रथम आरक्षित करावे, ओतूर धरणासह डोंगरी जयदर, कोसवन, जामशेत ल.पा. प्रकल्पाची कामे तत्काळ सुरू करावीत, कळवण आदिवासी जिल्हा करावा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, मविप्र संचालक रवींद्र देवरे, पक्ष निरीक्षक डॉ. योगेश गोसावी, कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, ज्येष्ठ नेते नारायण हिरे, कळवण पंचायत समितीचे माजी सभापती कौतिक पगार, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पंचायत समितीच्या सभापती संगीता ठाकरे, उपसभापती संजय पवार, रायुकॉँ तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, रायुकॉँ जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली कळवण बसस्थानकाजवळ जेलभरो आंदोलन करण्यात आले.जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी ओतूर धरणाचे काम मंजूर असून, निधी उपलब्ध आहे तरी ते बंद आहे. जामशेत, डोंगरी जयदर, कोसवन ल.पा. प्रकल्पाची कामे तत्काळ सुरू करून पाणी आरक्षित करावे, अशी मागणी करून यंत्रणेचे लक्ष वेधून घेतले. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, प्रगतिशील शेतकरी घनश्याम पवार, ज्येष्ठ नेते नारायण हिरे, डी.एम. गायकवाड, विलास रौंदळ यांनी मनोगत व्यक्त करून भाजपा सरकारवर टीका करून शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी केली. नांदगाव : तरीही सरकार अजून विचारच करतंय.. दुष्काळाच्या झळांनी व चुकीच्या धोरणांनी शेतकरी आत्महत्त्येच्या वाटेवर ढकलला जातोय. तरीही सरकार.. असे उद्गार आमदार पंकज भुजबळ यांनी नांदगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जेलभरो आंदोलनप्रसंगी काढले. हुतात्मा चौकात पक्षातर्फे रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले. आमदार पंकज भुजबळ यांच्यासह १५८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येऊन काही वेळाने सोडून देण्यात आले. धरणांमध्ये पाण्याचा मृतसाठा उरला आहे. प्रशासकीय स्तरावर शून्य नियोजन आहे. पुढील आठ महिने कसे जीवन जगायचे हा प्रश्न उभा ठाकलेला आहे. राज्य शासनाने शैक्षणिक फी माफी अशा मागण्या नांदगाव राष्ट्रवादी तालुका काँग्रेस पक्षाने केल्या आहेत. संतोष गुप्ता, मायावती पगारे, साहेबराव पाटील, दिलीप इनामदार, नानाभाऊ शिंंदे, राजाभाऊ पगारे, राजेंद्र आहेर आदिंंनी मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष शैलाताई गायकवाड, सुरक्षा केसकर, रामनिवास कळंत्री, राजेश कवडे, अरुण पाटील, डॉ. सुरेश गायकवाड, राजेंद्र गायकवाड, शिवाजी पाटील, नीलदादा सोनवणे, डॉ.यशवंत जाधव, किसन जगधने, राजेंद्र लाठे, राजेंद्र नहार, चिंधू माळी, धनंजय कमोदकर, महेंद्र शिरसाठ, डेव्हिड जॉर्ज यासह अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांनी जेलभरो आंदोलनात भाग घेतला. (वार्ताहर)