शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

चंपाषष्ठीनिमित्त जय मल्हारचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 01:51 IST

यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर करीत भंडारा उधळत परिसरातील श्री खंडोबा महाराज मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. मंदिरात दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.

नाशिकरोड : यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर करीत भंडारा उधळत परिसरातील श्री खंडोबा महाराज मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. मंदिरात दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.चंपाषष्ठीनिमित्त देवळालीगाव राजवाडा येथील श्री शिवमल्हार मंदिरात सकाळी रवींद्र राजाराम भालेराव दाम्पत्याकडून अभिषेक, पूजा, महाआरती करण्यात आली. प्राचीन असलेल्या या मंदिरात खंडेराव भक्त मेसुरामबाबा यांनी १८२९ मध्ये जिवंत समाधी घेतली असून, चंपाषष्ठीला त्यांचीदेखील पूजा केली जाते. तसेच श्री खंडोबा महाराजांच्या भाला-चिमटा यांचीदेखील पूजा करण्यात आली. चंपाषष्ठीनिमित्त मंदिराला रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई व मंडप टाकण्यात आला होता. दुपारपर्यंत भाविकांनी भाकरी-भरीतचा नैवेद्य दाखविण्यास गर्दी केली होती. दिवभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.देवळालीगाव श्री अण्णा भाऊ साठेनगर येथील खंडेराव मंदिराला चंपाषष्ठीनिमित्त रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे आल्हाट कुटुंबीयांनी श्री खंडोबा महाराजांची काठी व घरातील देव निफाड तालुक्यातील चांदोरी येथे भेटीसाठी नेले होते. तेथे काठीची विधिवत पूजा करून नवीन कपडे, झेंडे रीतीरिवाजानुसार लावण्यात आले. तेथून आणलेली काठी सकाळी १० वाजता दुर्गा देवी मंदिरात आणण्यात आली व तेथून वाजत-गाजत भंडाऱ्याची उधळण करत देवळालीगाव अण्णा भाऊ साठेनगरपर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. मंदिरात महाभिषेक, आरती व पूजा सोमनाथ केरू आल्हाट यांच्या हस्ते करण्यात आली. सायंकाळी भाकरी-भरीतचा प्रसाद वाटण्यात आला. यावेळी अंबादास आल्हाट, कैलास आल्हाट, अमोल आल्हाट, किरण डहाळे, किसन बस्ते, बाळू वाघमारे, कैलास गायकवाड आदींसह भाविक उपस्थित होते.गाडेकर मळा येथील श्री खंडेराव महाराज व श्री कानिफनाथ महाराज मंदिरात रवींद्र गाडेकर यांनी सपत्नी पूजा व आरती केली. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. सर्व मंदिरांमध्ये भाविक यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर करत भंडाºयाची उधळण करत दर्शनासाठी येत होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक