नाशिक : जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराय अशा घोषणा देत शहर परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. सिडको, नाशिकरोडला शिवजयंतीची मिरवणूक निघाली. त्याचप्रमाणे शाळांमध्ये शिवजयंतीनिमित्ताने बालगोपाळांनी शिवरायांची वेशभूषा केली होती. परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी वक्तृत्व स्पर्धांचेदेखील आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार करण्यासाठी गर्दी झाली होती. नाशिकरोड, जेलरोड, सातपूर, पंचवटी येथील पुतळ्यांनादेखील पुष्पहार अर्पण करण्यात आला.
जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराय
By admin | Updated: February 20, 2015 01:51 IST