शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जय बोला हनुमान की...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 02:09 IST

‘अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, एक मुखाने बोला जय जय हनुमान’..‘बजरंगबली की जय’, ‘जय श्रीराम जय हनुमान’असा जयघोष आणि ढोल-ताशांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या तालावर आदिवासी नृत्याने शनिवारी (३१) हनुमान जयंती सोहळ्यात रंगत भरली. हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत फडकणारे भगवे ध्वज यामुळे निर्माण झालेल्या भक्तिमय वातावरणामुळे नाशिककर भक्तिरसात चिंब झाले.

नाशिक : ‘अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, एक मुखाने बोला जय जय हनुमान’..‘बजरंगबली की जय’, ‘जय श्रीराम जय हनुमान’असा जयघोष आणि ढोल-ताशांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या तालावर आदिवासी नृत्याने शनिवारी (३१) हनुमान जयंती सोहळ्यात रंगत भरली. हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत फडकणारे भगवे ध्वज यामुळे निर्माण झालेल्या भक्तिमय वातावरणामुळे नाशिककर भक्तिरसात चिंब झाले. श्रीराम शक्तिपीठ, ब्रह्मचारी आश्रमातर्फे हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाकडीबारव येथून शनिवारी भगवान श्री हनुमान यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली. महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या रथासह रामभक्त हनुमानाचे रूप दाखविणाऱ्या चित्ररथाने रामभक्तांसह बजरंगबलीच्या उपासकांचे व भाविकांचे लक्ष वेधून घेतले. जुने नाशिक परिसरातील वाकडी बारव येथून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हनुमान जन्मस्थळ अंजनेरी येथील प्रज्वलित करून आलेल्या ज्योतीसह हनुमान भक्तांनी सहभाग घेतला. यावेळी आनंद आखाड्याचे सागरानंद सरस्वती महाराज, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे रामसिंग बावरी, श्रमिक रिक्षाचालक संघाचे अध्यक्ष भगवान पाठक, महेश सोपे, दिगंबर मोगरे आदी उपस्थितीत होते. यावेळी वाकडी बारव येथे जमलेल्या हनुमान भक्तांनी जय श्रीराम, जय हनुमानचा जयघोष करून परिसर दणाणून सोडला. दूधबाजारातील गणपती मंदिरात पूजन झाल्यानंतर ही मिरवणूक मेनरोड, एमजी रोड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा मालेगाव स्टॅण्डमार्गे निघालेली ही मिरवणूक रामकुंडावर नेण्यात आली. दुतोंड्या हनुमानाची  आरती करत मिरवणुकीची सांगता झाली.पुष्पवृष्टी, रांगोळ्यांनी स्वागतरामभक्त हनुमानाची मिरवणूक पाहण्यासाठी नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मिरवणूक मार्गावर नागरिकांनी रांगोळ्या काढून तसेच पुष्पवृष्टी करून स्वागत केले. या मिरवणुकीत जिवंत देखाव्यांसह हनुमानाची भव्य मूर्ती लक्षवेधी ठरत होती. या मूर्तीच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :Nashikनाशिक