उपनगर : गांधीनगर येथील रामलीला मैदानावर बंगाली बांधवांच्या जगतधात्री मातेच्या पूजा महोत्सवास प्रारंभ झाला. जगतधात्री मातेमधूनच नवदुर्गांची निर्मिती झाली असल्याने जगतदात्री मातेच्या पूजा महोत्सवाचे बंगाली बांधवांमध्ये मोठे महत्त्व आहे. कोलकाता येथील चंदनपूर येथे ५०० वर्षांपासून जगतधात्रीची पूजा केली जाते, तर राज्यात फक्त गांधीनगर येथे गेल्या सात वर्षांपासून बंगाली बांधव हा पूजा महोत्सव साजरा करतात. आजपासून सुरू झालेल्या जगतधात्री मातेचा पूजा महोत्सव रविवारपर्यंत राहणार असल्याची माहिती पूजा समितीचे अध्यक्ष डी. सी. डे यांनी दिली. यावेळी दिलीप बॅनर्जी, शंकर डे, मलाय भौमिक, अदिती चॅटर्जी, सुब्रतो मुखर्जी, कृष्णा डे, सिखा डे आदिंसह बंगाली बांधव उपस्थित होते.
गांधीनगरला जगतधात्री माता पूजा महोत्सव
By admin | Updated: October 30, 2014 00:21 IST