शहर पोलीस दलातील जुने पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे जाधव हे भद्रकाली पोलीस ठाण्यात सर्वात अगोदर कार्यरत होते. अत्यंत संवेदनशील हद्द असलेल्या या पोलीस ठाण्यात त्यांनी कर्तव्य बजावले होते. त्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात त्यांना कर्तव्याची संधी देण्यात आली. तेथून शहर वाहतूक शाखेतही नेमणूक करण्यात आली. शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी त्यांनी विविध प्रयोग केले. दीड वर्षांपासून जाधव हे अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. अलिकडेच त्यांना देवळाली कॅम्प पोलीस ठाणे प्रमुखाची सूत्रे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सोपविली आहेत. या पोलीस ठाण्याच्या हद्दीचा परिसर छावणी परिसर असून, या भागात लष्करी तळ असल्याने संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील हद्द असलेले पोलीस ठाणे म्हणून देवळाली कॅम्प ओळखले जाते. या भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जाधव यांना प्रयत्नशील रहावे लागणार आहे.
---
फोटो आर वर ०७कमलाकर नावाने.
===Photopath===
070621\07nsk_73_07062021_13.jpg
===Caption===
कमलाकर जाधव