शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जाधव, पाण्डेय यांचा नाशिक रोडला पाहणी दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 00:44 IST

नाशिक रोड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारी (दि.२०) संध्याकाळी उशिरा महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी अचानकपणे पाहणी दौरा केला.

ठळक मुद्देहॉटेल चालकाला पाच हजारांचा दंड : सामाजिक अंतराचा फज्जा अन‌् प्रतिबंधित प्लास्टीकचा सर्रास वापर

नाशिक रोड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारी (दि.२०) संध्याकाळी उशिरा महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी अचानकपणे पाहणी दौरा केला.

दोन्ही आयुक्तांनी नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात कारवाईचा हिसका दिला. स्थानक परिसरातील भगत हॉटेलमध्ये आयुक्त जाधव गेले असता, त्यांना ग्राहकांनी सुरक्षित अंतर राखल्याचे आढळून आले नाही, त्यामुळे त्यांनी हॉटेल चालकाला पाच हजाराचा दंड ठोठावला. नियमांचे पालन न केल्यास हॉटेल अनिश्चित काळापर्यंत बंद करण्याचा इशाराही यावेळी दिला. येथील राधिका हॉटेलमध्ये प्रतिबंधित प्लास्टीक वापरले जात असल्याने संचालकाला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला.तत्पूर्वी जाधव, पाण्डेय यांनी बिटको कोविड रुग्णालयाला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. बिटको रुग्णालयात लवकरच सुरू होत असलेल्या कोविड टेस्टिंग लॅबलाही भेट दिली. शहर व परिसरातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत आयुक्त जाधव यांनी तीव्र चिंता व्यक्त करून नागरिकांना खबरदारीचे आवाहन केले. शहरात करोना रुग्णसंख्या वाढीचा वेग असाच राहिला आणि नागरिकांनी निष्काळजीपणा कायम ठेवला, तर आरोग्य यंत्रणाही अपुरी पडेल, असेही जाधव म्हणाले. 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या