शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर चढणे, उतरणे होणार सोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:12 IST

नाशिककरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी राष्टÑीय महामार्गावर बांधण्यात आलेल्या सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलाचा अधिकाधिक वापर करण्याच्या हेतूने या पुलावर वाहने चढण्यासाठी व उतरण्यासाठी खास ‘एंट्री’ व ‘इक्झिट’ असे दोन पॉइंट तयार करण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. येत्या दोन महिन्यांत सिडको सातपूरकरांना पुलावर आपली वाहने चढविता येतील, तर इंदिरानगर, पेठेनगरच्या रहिवाशांना उड्डाणपुलावरून खाली उतरणेही सोपे होणार आहे.

नाशिक : नाशिककरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी राष्टÑीय महामार्गावर बांधण्यात आलेल्या सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलाचा अधिकाधिक वापर करण्याच्या हेतूने या पुलावर वाहने चढण्यासाठी व उतरण्यासाठी खास ‘एंट्री’ व ‘इक्झिट’ असे दोन पॉइंट तयार करण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. येत्या दोन महिन्यांत सिडको सातपूरकरांना पुलावर आपली वाहने चढविता येतील, तर इंदिरानगर, पेठेनगरच्या रहिवाशांना उड्डाणपुलावरून खाली उतरणेही सोपे होणार आहे.   नाशिक शहरातून जाणाºया मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहनांच्या वर्दळीचा विचार करता गरवारे पॉइंट ते के. के. वाघ दरम्यान एक सर्वाधिक लांबीचा उड्डाणपूल व पाथर्डी फाटा, स्टेट बॅँक चौक, राणेनगर, इंदिरानगर या ठिकाणी ओव्हर ब्रीज करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकडून येणाºया वाहनाला थेट धुळ्याकडे या मार्गाचा वापर करून प्रवास करता यावा असा त्यामागचा हेतू असून, के. के. वाघ महाविद्यालयापासून थेट गरवारे टी. पॉइंटपर्यंत धुळ्याकडून मुंबईकडे जाणाºया वाहनांनाही विनासायास प्रवास करणे त्यामुळे सोपे झाले असले तरी, या राष्ट्रीय महामार्गाचा नाशिक शहरातील वाहनचालकांना फारसा उपयोग होत नसल्याचे कालांतराने लक्षात आल्यामुळे त्यावरील उपाययोजना शोधण्याचे काम सुरू होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी या मार्गाची अनेकवार पाहणी केल्यानंतर त्यातील काही त्रुटी लक्षात आल्यावर त्या दूर करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.असे उतरता येईल पुलावरूनमहामार्गाचा वापर करणाºया नाशिककरांना धुळ्याकडून येताना द्वारका चौकातच आपली वाहने पुलावरून खाली उतरवून घेतली जात होती. त्यामुळे द्वारकापासून ते थेट सिडको, पेठेनगर, इंदिरानगरपर्यंत या वाहनांना समांतर रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत होती. आता मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्प्लेंडर हॉलजवळ महामार्गावरून खाली उतरण्याची सोय केली आहे. याठिकाणी उतरलेल्या सिडकोतील वाहनांना पुढे लेखानगर चौकातून सिडकोत जाणे सोपे होणार आहे, तर इंदिरानगर, पेठेनगर, राणेनगर येथे जाणाºया वाहनांनादेखील स्प्लेंडर हॉलपर्यंत महामार्गाचा वापर करून खाली उतरण्याची सोय होणार आहे.असा होईल महामार्गावर प्रवेशराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काही वर्षांपूर्वीच नाशिककरांची अडचण लक्षात घेऊन अंबड औद्योगिक वसाहतीतील गॅबरियल कंपनीच्या पाठीमागे राष्टÑीय महामार्गाला पंक्चर दिला आहे. त्यामुळे सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीतून धुळ्याकडे जाणाºया अवजड वाहनांना थेट महामार्गावर प्रवेश देण्यात आला. त्यामुळे या वाहनांनी नाशिक शहरातील समांतर रस्त्याचा वापर टाळण्यास मदत झाली. आता नवीन उपाययोजनांनुसार सिडकोतील स्टेट बॅँक चौकातही महामार्गाला पंक्चर देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सिडको व सातपूरच्या नागरिकांना स्टेट बॅँक चौकातूनच महामार्गावर प्रवेश मिळणे सोपे होणार आहे. पूर्वी या भागातील वाहनचालकांना थेट द्वारकापर्यंत जाऊन पुढे उड्डाणपुलावर प्रवेश करता येत होता.वाहतूक कोंडीत भरचौपदरीकरण झालेल्या मुंबई-आग्रा महामार्गाचा वापर करणाºया नाशिककरांना धुळ्याकडून येताना द्वारका चौकातच पुलाच्या खाली उतरावे लागते त्यामुळे अगोदरच वाहतुकीच्या गर्तेत सापडलेल्या द्वारका चौकात वाहनांची कोंडी होण्याची भर पडते. असाच प्रकार मुंबईकडून येणाºया वाहनांना एकतर गरवारे टी. पॉइंट येथे समांतर रस्त्यावर उतरावे लागते किंवा थेट इंदिरानगर बोगद्याजवळ वाहने खाली आणावी लागतात. परिणामी इंदिरानगर बोगद्याजवळ वाहतुकीची कोंडी नित्याचीच ठरलेली आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होऊनही नाशिककरांना मात्र ठिकठिकाणी वाहतूक कोंडीला कायम सामोरे जावे लागते.मुंबईकडे जाणे सोपे होईलमुंबईकडे जाणाºया वाहनांना महामार्गावर चढण्यासाठी द्वारका चौक व इंदिरानगर चौफुली असे दोनच पर्याय शिल्लक होते. त्यामुळे पेठेनगर, राणेनगर, तसेच सिडकोतील वाहनांना इंदिरानगर येथून महामार्गावर चढावे लागत होते अन्यथा थेट गरवारे टी. पॉइंटपर्यंत समांतर रस्त्याचा वापर करून महामार्ग गाठावा लागत होता. आता मात्र राणेनगरच्या पुढे हॉटेल सेव्हन हेवन येथे महामार्गाला पंक्चर देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याठिकाणी धुळ्याकडून येणाºया वाहनाला समांतर रस्त्यावर उतरण्याची जशी सोय होईल त्याचप्रमाणे पेठेनगर, राणेनगर, जुन्या सिडकोतील वाहनांना सेव्हन हेवन हॉटेलच्या समांतर रस्त्यावरून थेट महामार्गावरून मुंबईकडे जाण्यासाठी प्रवेश करता येणार आहे.