शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

पक्षकारांत अन्यायाची भावना निर्माण होऊ नये ही प्रत्येक घटकाची जबाबदारी : अनुजा प्रभुदेसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 01:25 IST

भारतीय संविधानाने प्रत्येकाला न्याय मिळविण्याचा हक्क दिला आहे. न्यायालयातील खटल्यांमध्ये विजय-पराजय होतच असतो. मात्र, पक्षकारांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण होता कामा नये, न्याययंत्रणेतील प्रत्येक घटकाची ही जबाबदारी असून ती पूर्ण क्षमतेने पार पाडली पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तथा जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी केले.

ठळक मुद्देनाशिकरोड न्यायालयाच्या नूतन वास्तूचे लोकार्पण

नाशिकरोड : भारतीय संविधानाने प्रत्येकाला न्याय मिळविण्याचा हक्क दिला आहे. न्यायालयातील खटल्यांमध्ये विजय-पराजय होतच असतो. मात्र, पक्षकारांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण होता कामा नये, न्याययंत्रणेतील प्रत्येक घटकाची ही जबाबदारी असून ती पूर्ण क्षमतेने पार पाडली पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तथा जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी केले.नाशिकरोड येथील दिवाणी-फौजदारी न्यायालयाच्या (क-स्तर) प्रशस्त इमारतीचे लोकार्पण रविवारी (दि.१४) दुपारी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.  प्रभूदेसाई यांनी ऑनलाइन फीत कापून इमारतीचे औपचारिक उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे होते.  प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश गणेश देशमुख, एस. पी. नाईक-निंबाळकर,  व्ही. ए. हिंगणे,  दिवाणी न्यायाधीश पी. एन. आवळे, महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. जयंत जायभावे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे, नाशिकरोड वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सुदाम गायकवाड, कोर्ट व्यवस्थापक अशोक दारके आदी मान्यवर  लोर्कापण सोहळ्यास उपस्थित होते.तीन एकर जागेत प्रशस्त वास्तूतीन एकर जागेत दोन वर्षांत उभ्या राहिलेल्या या न्यायमंदिराच्या वास्तूसाठी एकूण चौदा कोटी रुपये खर्च आला आहे. न्यायाधीशांची आठ दालने, पुरुष व महिला वकिलांसाठी स्वतंत्र बार रूम, पक्षकारांना बसण्याची तसेच पार्किंगची प्रशस्त सुविधा हे या इमारतीचे वैशिष्ट्य असल्याचे वाघवसे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय