शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जीवनात परिश्रमांसोबत  वेळेची सांगड घालणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:57 IST

आपल्या आयुष्यात ध्येय निश्चित केले पाहिजे. तसेच निश्चित केलेल्या ध्येयप्राप्तीसाठी नियोजन करून येणाºया संकटांवर यशस्वीपणे मात करण्यासाठी कठीण परिश्रम आणि वेळेची सांगड घालण्याचा मंत्र ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

नाशिक : आपल्या आयुष्यात ध्येय निश्चित केले पाहिजे. तसेच निश्चित केलेल्या ध्येयप्राप्तीसाठी नियोजन करून येणाºया संकटांवर यशस्वीपणे मात करण्यासाठी कठीण परिश्रम आणि वेळेची सांगड घालण्याचा मंत्र ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. दैनंदिन काम करताना अडचणी येतातच परंतु, त्याला न डगमगता सदैव सैनिकांप्रमाणे सामोरे जाण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.  अशोका युनिव्हर्सल स्कूलतर्फे सिटी सेंटर मॉल येथे आयोजित कलामहोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेविका तथा अनाथांच्या माई सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते शनिवारी (दि.२४) झाले. यावेळी अशोका ग्रुपचे चेअरमन अशोक कटारिया, स्कूलचे सहसचिव श्रीकांत शुक्ला, अस्था कटारिया, श्वेता मोदी आदी उपस्थित होते. अशोका ज्युनिअर कॉलेज, अशोका कॉलेज आॅफ एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांना या कलामहोत्सवाच्या निमित्ताने सपकाळ यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या कलामहोत्सवात घेण्यात आलेल्या मुलाखतीस त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.वैविध्यपूर्ण कलाकृतीलाकडावरील कलाकुसर, कॅलिग्राफीतील वैविध्यता, चित्रांतून साकारलेल्या थक्क करणाºया कलाकृती, म्युरलचे आधुनिक रूप साकारण्याचा प्रयत्न अशोका युनिव्हर्सल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अशोका कलामहोत्सवात केला. यात अशोका युनिव्हर्सल स्कूलच्या वडाळा, चांदसी, सिन्नर, अशोका ग्लोबल अकॅडमी, अर्जुननगर आणि अशोका ग्लोबल प्रि-स्कूल आदी शाखांमधील विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचा समावेश आहे. सिंधूताई सपकाळ यांच्या सन्मती बाल निकेतनच्या मदतीसाठी यंदाच्या दोनदिवसीय कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Schoolशाळा